कराड (विजया माने) : श्री गणपती मंदिर ट्रस्ट आणि गजानन नाट्य मंडळ शनिवार पेठ तेली गल्ली कराड यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त गणपती मंदिराच्या पहिल्या मजल्यावर महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रमय रांगोळी प्रदर्शन आयोजित केलेला आहे या सर्व चित्रमय रांगोळ्या सौ साक्षी राजेश शहा यांनी सलग 28 दिवसांच्या अथक परिश्रमानं साकार केलेले आहेत हे चित्रमय प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व शिवप्रेमी शंभू प्रेमी आणि धर्मवीर पाईकांनी तसेच सर्व हिंदू बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास गजानन नाट्य मंडळाचे सर्व छोटे-मोठे कार्यकर्ते गेली 35 वर्ष गणपती मंदिरामध्ये करीत आहेत यामध्ये कार्यकर्ते कोणी पायात चप्पल घालत नाहीत काही जण गोड खाद्य वर्ज करतात कित्येक जण लग्न समारंभ जात नाहीत अशा पद्धतीने हा बलिदान मास दुःखाचा मास म्हणून पाळत आहेत तसेच दररोज रात्री आठ वाजता सर्वजण एकत्र येऊन संभाजी सूर्योदय यावरील श्लोक एकत्रित म्हणतात शिवप्रतिष्ठान से हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या मार्गदर्शनातून हे सर्व कार्यक्रम केले जातात




