Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रडॉ.अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जी प शाळा साळशिरंबे "अतुलसंस्कार" सुंदर हस्ताक्षर स्पर्धा...

डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जी प शाळा साळशिरंबे “अतुलसंस्कार” सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी : कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.श्री.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा साळशिरंबे ता.कराड येथे, “अतुलसंस्कार” सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

मोठा गट व लहान गटा मध्ये पार पडल्या यासाठी, युवा नेते मा.पंकज मित्र परिवार याच्या वतीने दोन्ही गटातील वेगवेगळ्या 1 ते 3 क्रमांकाना रोख रक्कम, चषक, प्रसस्तीपत्र देण्यात येणार आहे. त्याच बरोबर सर्व सहभागी स्पर्धाकांना प्रशास्तीपत्रक देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले, आम्ही दर वर्षी आमचे नेते, मा.आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साळशिरंबे गावामध्ये व येळगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये नेहमीच विविध स्पर्धाचे, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याच पद्धतीने आज “अतुलसंस्कार” सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे. डॉ.अतुल बाबा हे शिक्षण, आरोग्य, शेती, सामाजिक, राजकीय क्षेत्रात नेहमी सांगत असतात आपल्या देशाचे भविष्य हे विध्यार्थी असतात, समाज सुधारणेसाठी आपल्या लहान मुलांच्यावर्ती चांगले संस्कार होणे गरजेचे असते, त्यांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे म्हणून आम्ही या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे यामधून विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारून त्यांना एक स्पर्धेची प्रेरणा मिळावी व भविष्यात स्पर्धा परीक्षामध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपध्यक्ष श्री.पंकज पाटील, श्री.शरद साळुंखे, भाजपा बुथ अध्यक्ष श्री.जयकर पाटील, बुथ अध्यक्ष मा.तानाजी पवार, मा.गणेश यादव, शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय बांदेकर (सर), सौ.आडके मॅडम, सौ.भिवरकर मॅडम, श्रीमती.पाटील मॅडम, कुंभार मॅडम व विद्यार्थी, विध्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
*कराड प्रतिनिधी विजया माने*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments