Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रशनिवारी तमाशा शिबिराचा समारोप,....! माजी आमदार कवि लहू कानडे, भारत...

शनिवारी तमाशा शिबिराचा समारोप,….! माजी आमदार कवि लहू कानडे, भारत गणेशपुरे यांची उपस्थिती लाभणार; गावची जत्रा, पुढारी सत्तरा.. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी आयोजित तमाशा सम्राट काळू बाळू कवलापूरकर यांना समर्पित केलेल्या तमाशा शिबिराचा समारोप समारंभ शनिवार दिनांक 29 मार्च रोजी संपन्न होत असून यावेळी गावची जत्रा, पुढारी सत्तरा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थितीत राहणार असल्याची माहिती या शिबीराचे संचालक तथा लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य विभाग, आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तसेच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहकार्याने गेली दहा दिवसाचे तमाशा प्रशिक्षण शिबीर लोककला अकादमी (मुंबई विद्यापीठ) येथे सुरू होते.या शिबिरामध्ये तमाशा परंपरेनुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने गण, गौळण, बातवणी, रंगबाजी असे तमाशा कलेचे विविध कला प्रकार या क्षेत्रातील अभ्यासकांनी या दरम्यान शिकविले.त्यानुसार तमाशा शिबिरात सहभागी झालेल्या विदयार्थ्यांनी शेवटच्या दिवशी एक पारंपारिक तमाशा सादर करायचा असतो. त्यामुळे शनिवारी (ता. 29मार्च) पारंपारिक तमाशा कला रसिकांना विनामूल्य बघायला मिळणार आहेत.
या शिबीराच्या समारोपाला माजी आमदार, जेष्ठ कवि लहू कानडे,”चला हवा येऊ दया” फेम भारत गणेशपुरे, सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक संतोष पवार, चित्रपट अभिनेत्री, लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे, जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी तमाशा शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी *गावची जत्रा, पुढारी सतरा* हा तमाशा सादर करणार आहेत. हे शिबिर सुरू झाल्यावर श्री. कृष्णा मुसळे (ढोलकी)श्री. मदन प्रसाद (हार्मोनियम गायकी )श्रीमती हेमाली म्हात्रे(नृत्य),श्री. योगेश चिकटगावकर (अभिनय ) लावणी सम्राधणी प्रमिला लोदगेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
शनिवार दि. 29 मार्च रोजी दुपारी 2.00 वाजता कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या शाहिर पट्ठे बापूराव कला दालन सांस्कृतिक भवन तिसरा मजला (गेट नंबर दोनच्या बाजूला) येथे या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहेत. सदर कार्यक्रम प्रवेश विनामूल्य आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments