प्रतिनिधी(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील भेदा चौक येथे असणाऱ्या भेदा हॉस्पिटल मध्ये शनिवारी रात्री भरधाव ट्रॅक घुसून लोखंडी गेट तसेच भिंत याचे नुकसान झाले आहे.यावेळी टू व्हीलर गाडींचे ही नुकसान झाले आहे. या अपघातामुळे ट्रॅक ड्रायव्हर जखमी झाला असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. यावेळी इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री झालेल्या घटनेमुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अपघात होवून 12 तास ओलांडले तरी अजून ही गाडी आहे त्या अवस्थेत त्या जागी असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याचे दिसून येत आहे यामुळे ट्रॅपिक होत आहे. याकडे अजून प्रशासन यांनी लक्ष दिलेले नाही.
भेदा हॉस्पिटल मध्ये ट्रॅक घुसला;जीवितहानी नाही
March 23, 2025 / 1 minute of reading




