Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्ररयत संघटना कराड तर्फे संवाद मेळावा; उदयसिंह पाटील यांचा अजित पवार गटात...

रयत संघटना कराड तर्फे संवाद मेळावा; उदयसिंह पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेशाबाबत चर्चा

प्रतिनिधी(प्रताप भणगे) :

रयत संघटना कराड तर्फे रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी खोडशी या ठिकाणी संवाद मिळावा पार पडला. संवाद मेळाव्यास राज्यसभा खासदार नितीन काका पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रयत कारखाना ,कोयना बँक, कोयना दूध संघ, खरेदी विक्री संघ ,शामराव पाटील पतसंस्था ,बाजार समिती पदाधिकारी ,उपस्थित होते. उपस्थिती दरम्यान रयत संघटनेचे सर्वेसर्वा उदयसिंह पाटील दादा तसेच रयत संघटनेचे अनेक पदाधिकारी त्यांच्या शिखर संस्थांचे चेअरमन, उपचेअरमन तसेच असंख्य रयत संघटनेवर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पक्षात पक्षप्रवेश करण्यासंबंधी तसेच भविष्यातील होणाऱ्या पक्षप्रवेशाबद्दल नितीन काका पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली येत्या काही दिवसातच उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून पक्षप्रवेशासाठी भव्य अशी सभा कराडत घेण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. लवकरच याबाबतची तारीख जाहीर करण्यात येईल रयत संघटनेचे सर्व कार्यकर्ते रयत संघटनेचे सर्वेसर्वा उदयसिंह पाटील दादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे आश्वासन सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी दिले. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीत उदयसिंह पाटील तसेच अजित दादा यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यास भविष्यात उदयसिंह पाटील दादा यांना योग्य तो पक्षाकडून सन्मान देण्यात येईल असे आश्वासन खासदार नितीन काका पाटील (अजित पवार गट) यांच्याकडून देण्यात आले. संबंधित मेळाव्या दरम्यान अनेकांनी विलासराव पाटील काका यांनी आपले ३५ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या संघर्ष तसेच विकास याबाबत माहिती देण्यात आली २०१४ पासून रयत संघटनेला अनेक संघर्षातून जावे लागले हा काळ कुटे तरी चांगल्या प्रवाहाकडे जावा यासाठी हा निर्णय उदयसिंह पाटील दादा यांनी घेतला असे सांगण्यात आले. अशीच सातारा जिल्ह्यात साथ राहिली तर भविष्यात दादा नावापुढे आमदार हा शब्द लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या सातारा जिल्हाध्यक्ष यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये एक भावनिक साद निर्माण झाली .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments