सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय लाखो कुशल कामगार पुरवठा करणाऱ्या या संस्थेने देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. या आयटीआय निर्देशक राज्यस्तरीय अधिवेशन साताऱ्यात होत असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. रविवार दिनांक २३ मार्च रोजी २३ वे राज्यस्तरीय अधिवेशन साताऱ्यात छत्रपतींच्या राजधानीत होत आहे.
महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक २३ मार्च रोजी स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक सभागृह, शेंद्रे तालुका जिल्हा सातारा याठिकाणी संपन्न होणार आहे . त्याची जय्यत करण्यात आलेली आहे. अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. महादेव माळी यांनी दिली.
निदेशक संघटना ही कौशल्य विकास विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय मध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम निदेशक बांधवांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव संघटना असून दिनांक २ जून १९७९ रोजी या संस्थेची स्थापना झालेली आहे. या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन दर तीन वर्षांनी घेतली जाते. मात्र कोविड काळामुळे हे अधिवेशन सहा वर्षांनी सातारा जिल्ह्यात होत आहे. बीयावेळी राज्यभरातून सुमारे तीन हजार निदेशक बंधू भगिनी उपस्थित राहतील. या अधिवेशन स्थळी सर्व तयारी आयोजकांनी पूर्ण केलेली आहे.
या अधिवेशनातच द्वितीय सत्रात राज्य आणि विभागीय पदाधिकारी पदी इच्छुक उमेदवारांच्या निवडणुका देखील होणार आहे .असून त्याचीही तयारी झालेली आहे,असे संघटनेचे सरचिटणीस विनोद दुर्गपुरोहित यांनी नमूद केले.
या अधिवेशनास राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्री.नितीन पाटील (जाधव) तसेच सर्व शिक्षक आमदार व पदवीधर आमदार, विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सहा वर्षाने होणाऱ्या या अधिवेशना साठी आयटीआय निदर्शक यांच्यामध्ये उत्साह वाढलेला आहे अशी माहिती संघटनेचे क्रियाशील सदस्य श्री महानवर यांनी दिलेली आहे.