Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रपावशेवाडीचा ****राम**** हरपला

पावशेवाडीचा ****राम**** हरपला

बामणोली : जावळी तालुक्यातील कोयना जलाशयानजीक असलेल्या पावशेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री राम पवार वय जी६० यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
कोयना भागातील पुनर्वसन व इतर समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले. माजी आमदार जी जी कदम, आमदार शशिकांत शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक विधायक उपक्रम तसेच कोयना भागातील विकास कामांमध्ये आपला खारीचा वाटा उचलला होता.
कोयना पूर्व सेवा संघ २२ गाव संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शासकीय पातळीवर ग्रामस्थांची भूमिका समर्थपणाने मांडली होती. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणारे १०५ गाव समाजात देखील सर्वांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते . त्यांच्या निघून जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
सामाजिक कार्यामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक व युवा पिढी यांच्याशी चर्चा करून त्यांनी व्यक्त केलेली मते हीच भूमिका समजून ते शासकीय पातळीवर निर्णय घेत होते.. त्यांचे मूळ गाव पावशेवाडी असले तरी ते कोयना भागाचे खंबीर देते म्हणून राजकीय मंडळींमध्ये त्यांचे वजन होते. शासकीय पातळीवरती समन्वयाची भूमिका घेणारे धरणग्रस्त नेते म्हणून त्यांना अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी झटणारे धरणग्रस्त नेते तसेच पत्रकार अजित जगताप, संतोष मालुसरे, अक्षय गोरे ,निलेश शिंदे, सूर्यकांत पवार आदी मान्यवरांनी राम पवार यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

_________________________________
फोटो – पावशेवाडी येथील स्वर्गवासी राम पवार

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments