Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रये लाल रंग कब मुझे छोडेगा मानगंगेचा टाहो . ....

ये लाल रंग कब मुझे छोडेगा मानगंगेचा टाहो . ….

म्हसवड(अजित जगताप) : माण तालुक्यातील म्हसवड शहराच्या हद्दीतील अनाधिकृत वाळू उपसा थांबता थांबेना. यामुळे निसर्गाची खूप मोठी हानी होत आहे. तसेच महसूल बुडवला जात आहे. ही बाब उघड झाली असली तरी सकाळी कारवाई सायंकाळी पुन्हा बेकायदेशीर वाळू उपसा हे केव्हा थांबणार? अशी निसर्गप्रेमी विचारणा करत आहे. ये लाल रंग कब मुझे छोडेगा असे मानगंगा नदीचे पात्र टाहो फोडू लागलेला आहे.
याबाबत माहिती अशी की धुलीवंदनाच्या निमित्ताने म्हसवड परिसरात धुलीवंदनाची रंगपंचमी व धुळवड साजरी होत असतानाच लाल रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन यांनी नियमितपणाने अनाधिकृत वाळू उपसा करून दिवसाढवळ्या वाहतूक सुरू केली होती. यावेळी म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी अक्षय सोनवणे, अनिल वाघमोडे, नवनीत शिरकोंडे, योगेश सूर्यवंशी, सतीश जाधव, राहुल थोरात, दीपक सपकाळ व म्हसवड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अचानकपणाने पाठलाग करून शिरगाव – पुळकुटी रस्त्यावरील बनगर पुलावर लाल रंगाची ट्रॅक्टर व ट्रॉली आणि वाळू भरलेले मुद्देमाल असा मिळून सात लाख तेहतीस हजाराचा माल जप्त केला आहे. सिद्धीनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मानगंगा नदीचे पात्र व नदीचा प्रवाह कमी झाल्यानंतर नदीतील वाळू उपसा करण्याची स्पर्धा लागते. गौण खनिज विभागाने या भागातील वाळू उपसा लिलाव अद्यापही पुकारला नसतानाही मंत्री महोदयांच्या मतदारसंघातच अनाधिकृत वाळू उपसा होत आहे. खरं म्हणजे एवढं मोठं धाडस वाळू उपसा करणाऱ्यांचे होत असेल तर ते एक नवलाईची गोष्ट आहे.
म्हसवड नव्हे तर माण खटाव तालुक्यात प्रशासकीय व इतर खात्याच्या अधिकाऱ्यांची तसेच पोलीस खात्यात नवीन अधिकारी बदलून आला की, त्यांना भेटण्यासाठी शांतता प्रिय नागरिकांच्या पूर्वीच काही वाळूमाफिया, दलाल, बेकायदेशीर दारू, मटका, जुगार अड्डा चालवणारे वशिलेबाजी करून भेट घेतात. तर काहीजण त्यांना सिंघम ची पदवी बहाल करून वंश करण्याचा प्रयत्न करतात. खरोखरच प्रामाणिकपणाने जर पोलिसांना खुलेआम कर्तव्य बनवण्याची संधी दिली तर लालच नव्हे तर सप्तरंग उघडा पाडण्याची धमक नक्कीच महसूल व पोलीस यंत्रणेकडे आहे. आता जी कारवाई झालेली आहे. ते. हिमनगाचे टोक असले तरी त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ केवटे यांनी केलेले उपोषण आंदोलन आणि त्यातील मुद्दे सत्य असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यानंतर शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये आता म्हसवड येथील मानगंगा पात्रात झालेली ही अनधिकृत वाळू उपसा पहिलीच कारवाई आहे. अजून ९९ कारवाई बाकी राहू नये. अशी अपेक्षा आहे . तसेच म्हसवड पोलीस यंत्रणेचे अभिनंदनही जनतेकडून केले जात आहे. सिग्नल मध्ये लाल रंग थांबणे, पिवळा रंग सावध राहणे, आणि हिरवा रंग वाहतूक सुरू करणे असा असला तरी नाधिकृत वाळू उपसा व बेकायदेशीर धंद्याबाबत सप्तरंग असून या रंगावरही कारवाई व्हावी. अशी योजना राबवणे गरजेचे आहे.
… . ………….. ……………
फोटो- म्हसवड मानगंगा नदीतील अनाधिकृत वाळू उपसा जप्त करताना पोलिस यंत्रणा

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments