जावळी (राम शिंदे): नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जावळी तालुक्यात शिवसेना–भाजप यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली. काहींना उमेदवारी मिळाली, तर काहींमध्ये नाराजीची भावना होती.
कुसुंबी जिल्हा परिषद गट महिला आरक्षित झाल्याने मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या सौ. अर्चनाताई रांजणे या यावेळी भाजपकडून रिंगणात होत्या. पंचायत समितीसाठी कुसुंबी गणातून सौ. पुष्पाताई चिकणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. रांजणे परिवारामार्फत मंत्री बाबाराजे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे झाली असली, तरी स्थानिक पातळीवर काही प्रमाणात नाराजीची चर्चा होती.
अशा परिस्थितीत शिवसेनेसमोर सक्षम उमेदवार उभा करण्याचे आव्हान होते. या वेळी सर्वसामान्य जनतेसमोर एकच नाव पुढे आले—एकनाथ ओंबळे. गेली ३०–३२ वर्षे जनसेवेत सक्रिय असलेल्या ओंबळे यांनी मेढा व बामणोली विभागात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
Eknath Shinde यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि पालकमंत्री Shambhuraj Desai यांच्या सहमतीने कविता ओंबळे यांना कुसुंबी गटातून उमेदवारी देण्यात आली. सर्वसामान्य कुटुंबातील निष्ठावंत कार्यकर्त्याला दिलेल्या या संधीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
३८ गावांचा स्वाभिमान जागा
बामणोली विभागातील ३८ गावांमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांनी परिस्थिती हाताळली. जावळी तालुका संपर्कप्रमुख राम शिंदे, विभागप्रमुख गणेश शिंदे, सरपंच हरिभाऊ कदम, शाखाप्रमुख संतोष कदम, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल तोरणे, युवा नेतृत्व संदीप उतेकर व विष्णू भोसले या सात शिलेदारांनी तब्बल दहा दिवस गावागावात जाऊन प्रचार केला.
भागाचा स्वाभिमान, भूमिपुत्र नेतृत्वाची साथ आणि झालेली विकासकामे हे मुद्दे त्यांनी जनतेसमोर मांडले. मोठ्या सभांऐवजी घराघरात संपर्क साधून मतदारांशी संवाद साधण्यात आला.
मतमोजणीत चुरस, शेवटच्या टप्प्यात पलडा फिरला
मतमोजणीच्या सुरुवातीला आंबेघर गणात कविता ओंबळे यांनी आघाडी घेतली. मात्र कुसुंबी गणात अर्चनाताई रांजणे यांनी आघाडी मिळवत चुरस निर्माण केली. निकाल वर-खाली होत असताना बामणोली विभागातील मतदान निर्णायक ठरले.
तेटली, आपटी, निपाणी, वाकी या बूथमधील मतदानाने समीकरण बदलले. या सात गावांतील मतदारांनी दिलेला कौल कविता ओंबळे यांच्या बाजूने झुकला आणि शिवसेनेला निर्णायक आघाडी मिळाली.
विकासकामांचा परिणाम
कोयना विभागात पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी, रस्ते रुंदीकरण, पूल बांधकाम, देवस्थान विकास, पर्यटनवाढ आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मिती अशा विविध प्रकल्पांमुळे स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर मतदारांनी कौल दिल्याचे बोलले जाते.
या विजयामुळे १९९५ नंतर शांत झालेली कोयना विभागातील शिवसेना पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. एकनाथ ओंबळे यांच्या नेतृत्वाखाली संघटना गावागावात पोहोचल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो.
भूमिपुत्र नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त जनतेने दिलेली ही ‘विजयी सलामी’ असल्याची भावना समर्थकांनी व्यक्त केली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पुन्हा भगवा फडकला, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे.
शिवसेनेच्या विजयाचे शिल्पकार ठरणाऱ्या जावळी तालुक्यातील कोयना विभागातील नाराज असणाऱ्या ३८ गावांना पक्षश्रेष्ठी आणि भूमिपुत्र ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब कसा न्याय देऊन त्याचा सन्मान राखतात आणि भागाची नाराजी दूर करतात याकडे सर्वाचे लक्ष




