कराड : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डाॅ.संदीप डाकवे यांनी तुकाराम बीजेनिमित्त तुळशीच्या पानावर संत तुकाराम महाराज यांचे चित्र साडेचार सेमी बाय अडीच सेमी आकाराच्या पानावर दोन बाय अडीच सेमी आकारात रेखाटले आहे.
यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी वारकरी पंचा, मोरपीस यावर संत तुकाराम महाराज यांची अप्रतिम आणि देखणी चित्रे साकारली आहेत.
‘‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’’ असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदेह वैकुंठागमन केलं तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो.
यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी टी शर्ट वर विठूरायाचे चित्र, शब्दातून विठ्ठलाचे चित्र, पोस्टरमधून शुभेच्छा, भिंतीवर वारीचे चित्र, अक्षर अभंग वारी उपक्रम, न अनुभवलेली वारी हस्तलिखित, एका पानावर हरिपाठ, अभंग चित्र वारी उपक्रम, अक्षर चित्र वारी उपक्रम, तुळस पानावर विठ्ठल, वारकरी पंचावर संत तुकाराम असे विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत.
पंढरपूरचे विठू माऊली हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात. तुकाराम बीजच्या दिवशी तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसमंत भरून निघतो. संत तुकाराम महाराजांनी अभंग रचले आणि यातून जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला.
तुकाराम बीजेच्या पार्श्वभूमीवर तुळशीपानावर रेखाटलेल्या संत तुकाराम महाराजांच्या चित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तुळशीपानावर रेखाटले संत तुकाराम महाराजांचे चित्र
RELATED ARTICLES