धारावी(भीमराव धुळप) : मुंबईतील धारावी येथील साई हॉस्पिटलमध्ये जागतिक किडनी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. वाघमारे यांनी किडनीचे महत्त्व, आरोग्य टिकवण्याचे उपाय, तसेच किडनीसंबंधी रोग व त्यावर योग्य उपचार याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात किडनी आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णाच्या हस्ते साई आणि आयुष हॉस्पिटल चे विश्वस्त डॉ सुहास देसाई सर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापण्यात आला. त्यानंतर डॉ. वाघमारे यांनी उपस्थितांना किडनीच्या आरोग्याविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि पाणी कमी पिण्यामुळे किडनीचे आजार वाढत आहेत. विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना किडनीच्या आजाराचा मोठा धोका असतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाचे उपाय:

1. पुरेसा पाणी प्या – दररोज किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
2. संतुलित आहार घ्या – प्रथिनयुक्त आणि कमी मीठ असलेला आहार घ्यावा.
3. मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवा – या दोन आजारांमुळे किडनीचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
4. अल्कोहोल आणि सिगारेट टाळा – यामुळे किडनीचे कार्य प्रभावित होते.
5. नियमित व्यायाम करा – शारीरिक सक्रियता किडनीला निरोगी ठेवण्यास मदत करते.
या कार्यक्रमाला अनेक नागरिक रुग्ण आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ सुहास देसाई, डॉ वाघमारे, डॉ फारुक, डॉ आश्रीफ, बाबू भाई, संदीप कवडे, उपस्थित होते. साई हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने असे आरोग्यविषयक कार्यक्रम भविष्यातही घेत राहण्याचे आश्वासन दिले. किडनी दिनाच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांनी आरोग्यासाठी सकारात्मक सवयी लावून घेण्याचा निर्धार केला.