प्रतिनिधी : प्रत्येक वर्षी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असणारे यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक राजकीय मंडळी कराड येथील प्रीतिसंगमवर येतात. आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार तालुका कराड दौऱ्यावर येत असून ते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनासाठी येणार आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते अँड.उदयसिंह पाटील दादा यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
कराड येथील प्रीतिसंगमवर अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बाजार समिती कराड येतील कोयना बँक मुख्य कार्यालयास भेट देणार आहेत. यावेळी या ठिकाणी महत्वाच्या बैठकीत अनेक चर्चा होणार असून त्यानंतर उदयसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश निश्चित केला जाणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.यामुळे कार्यकर्त्यांना उत्सुकता वाढली असून 10 वर्ष सत्तेच्या बाहेर असणारी संघटना यामुळे सत्तेत आल्यावर संघटना मजबूत करण्यासाठी बळ मिळेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजून कोणती जबाबदारी अथवा पद उदयसिंह पाटील दादा यांना मिळणार का याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. यावेळी मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकारातून महत्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत खा. नितीन पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या निर्णयामुळे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.तसेच आणखी किती पदाधिकारी पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वसामान्य मतदार लक्ष लागून आहे दादाबरोबर आणखी कार्यकर्ते काँग्रेस पदाधिकारी यांनी प्रवेश केल्यास कराड ला काँग्रेस गडाला मोठा सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही संघटना टिकवून ठेवण्यासाठी दादांकडे कोयना बँक, शामराव पाटील पतसंस्था ,बाजार समिती ,कोयना दूध संघ,रयत सहकारी साखर कारखाना असे उद्योग सोबतीला आहेत यातून कार्यकर्त्यांची फळी बांधण्यास दादांना मदत होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अँड.उदयसिंह पाटील दादा यांचा प्रवेश होण्याची शक्यता ?
RELATED ARTICLES