सातारा(अजित जगताप ) : महाराष्ट्राचे भाग्यविधाते तसेच देशाचे माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मारकाच्या परिसरातील सुशोभीकरण तातडीने करावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जावळी तालुका अध्यक्ष साधू चिकणे यांनी केली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिलेले आहे.
स्वर्गीय
यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान,
संरक्षणमंत्री पदभार सांभाळला आहे. स्वर्गीय यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला. जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे सातारा शहरात उभा पुतळा असून त्याच्या परिसरातील स्वच्छता व सुशोभीकरण करणे गरजेचे आहे. स्वर्गीय यशवंत चव्हाण प्रेमी त्यांच्या स्मृतीची आठवण जतन करण्यासाठी त्या ठिकाणी भेट देतात.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार
प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व
इत्यादीशी निगडीत आहेत. स्वर्गीय चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्न,
भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा
मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला.
अशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे सातारा शहरातील पोवईनाका या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला आहे. सदर पुतळा फार
जुना असल्याने त्याच्या सभोवताली सुशोभिकरण करणे आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महोदय
मा.ना.अजितदादा पवार साहेब यांचेशी श्री साधू चिकणे यांनी चर्चा केली आहे . सातारा जिल्हा परिषद स्वनिधीमधून याबाबत विशेष बाब म्हणून स्मारकाच्या सुशोभीकरणाचे तात्काळ काम करावे. बुधवार दिनांक १२ मार्च रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात अनेक जण उपस्थित राहणार आहेत.तरी यशवंतराव चव्हाण साहेबाच्या पुतळा शेजारी सुशोभिकरण करुन घेणेबाबत आपलेस्तरावरुन खास
बाब म्हणून निधी उपलब्ध करुन दयावा. अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे.
__________________________
फोटो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाच्या सुसिबी करण्याची मागणी करताना श्री चिकणे (छाया- अजित जगताप सातारा)