Monday, September 22, 2025
घरमहाराष्ट्ररोटरी क्लब ऑफ मलकापूर व शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातर्फे जागतिक महिला...

रोटरी क्लब ऑफ मलकापूर व शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

प्रतिनिधी(विजया माने) : रोटरी क्लब ऑफ मलकापूर व शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा कर्मसिद्धी सन्मान सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ सुभाष कांबळे यांनी केले प्रत्यार्याच्या हस्ते रोटरी पदाधिकारी यांचे स्वागत केले रोटरी दिलीपराव संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विशेष पुरस्कार डाॅक्टर सोनाली थोरात, डाॅक्टर सारिका गावडे,डाॅक्टर सुषमा मोटे, डाॅक्टर अंजली उदासी, डाॅक्टर कागदी, सौ विजया माने पत्रकार यांना रोटरी शाल सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी रोटरी चद्रशेखर दोडमणी, रोटरी दिलीपराव संकपाळ,रोटरी सलीम मुजावर, रोटरी भगवानराव मुळीक, रोटरी सुनिल बसुगडे,रोटरी अमोल मोटे, डाॅक्टर यु आर पाटील उपस्थित होते यावेळी प्राचार्य डाॅक्टर घाटगे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुरेश यादव यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार प्रा डाॅक्टर मारुती सुर्यवंशी यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

*कराड प्रतिनिधी… विजया माने*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments