Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रसातारा डिजिटल मिडीया कार्यशाळेचे मंत्री ना. भोसले यांनी केले कौतुक

सातारा डिजिटल मिडीया कार्यशाळेचे मंत्री ना. भोसले यांनी केले कौतुक

सातारा(अजित जगताप) : सध्या प्रसार माध्यमात डिजिटल मिडीयाचे युग आले आहे . त्याचे महत्व वाढले आहे. आजची बातमी दुसऱ्या दिवशी वाचनात येत होती तसे आज राहीले नाही. आता काही घडल्यास सेकंदात ते जगभरात पोहचत आहे. त्यामुळे डिजिटल मिडीयाचा प्रवाह वाढले आहे. त्यामुळे बातम्या देताना पत्रकारांनी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे असे डिजिटल मिडीया पत्रकार संपादक संघटणेच्या कार्यशाळेला शुभेच्छा देताना राज्याचे बांधकाम मंत्री व लातूर जिल्हा पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे सांगितले.
सातारा येथिल छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात डिजिटल मिडीया पत्रकार संपदक संघटनेच्या कार्यशाळेला बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले , संघटनेचे राज्यध्यक्ष राजा माने, जिल्हा माहिती अधिकारी तथा उपसंचालक (पूणे) श्रीमती वर्षा पाटोळे , छ. शिवाजी महाराज महाविद्यालय प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, संघटनेचे राज्य समन्वयक तेजस राऊत , राज्य सचिव महेश कुगावकर, प्रदेशाध्यक्ष (साप्ताहीक ) संजय कदम, राज्य सह सन्मवयक गणेश बोतालजी, राज्यसदस्य सचिन भिलारे, प. महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे, सातारा शहराध्यक्ष अजित सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे उपस्थितीत दिप प्रज्वन करून वृतपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच प्रा. डॉ. राजेंद्र मोरे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. राज्याध्यक्ष राजा माने यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती वर्षा पाटोळे यांनी आपल्या हातात दुधारी हत्यार तलवार हे शस्त्र आहे. आणि ते दोन्ही बाजुने चालवता येते. त्याचा वापर हा जबाबदारीने करणे गरजेचे आहे, त्याचा अभ्यास असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले.

मंत्री किंवा अधिकारी एकादी कॉम्परंस बोलवतो. त्यावेळी त्याला आपल्या माध्यमातुन समाजातील जनतेला माहिती पोहचवायची असते. कारण, पत्रकार माहिती पोहचविण्याचे वाहन असता परंतु त्यावेळी तसे न होता आपण त्यांच्यावर प्रश्नांची बंबारिंग करीत सुटता ते जेलचे कैदी आहेत का ?असेच आपण वागत असता तर असे न करता बोलवण्या मागचा उद्देश आपण समजावुन घेणे व तो समाजपर्यंत पोहविण्याचे काम करणे गरजेचे आहे. असेही मत श्रीमती पाटोळे यांनी यावेळी व्यक्त केले.
य राज्यध्यक्ष राजा माने म्हणाले डिजीटल मिडीया सध्या गतीने वाढत आहे. डिजीटल मिडीयाला नाव नाही, चेहरा नाही परंतु त्याचा प्रभाव मात्र दिसुन येतो. तरीही राज्य व केंद्र सरकार याबाबत कॅम्पुज असल्याचे सांगुन बीडचे प्रकरण प्रथम डिजिटल मिडीयाने जनतेसमोर आणले नंतर प्रस्तापित मिडीयाने ते उचलुन धरले याची आठवण करून दिली.

कार्यशाळा म्हणजे काय तर स्पष्टपणे विचारलेल्या प्रश्नांना मिळालेली उत्तरे होय. आणि आजची कार्यशाळा सुंदर केल्याबद्दल अभिनंदन करून प्रत्येक जिल्हयात अशा कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी ज्या वेळी आपणास कोणतीही मदत हवी असेल त्यावेळी ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे सांगुन कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सातारा जिल्हातुन जेष्ट पत्रकार अजित जगताप तसेच डिजिटल मिडीया पत्रकार संपादक व सातारा जिल्हा कार्यकारीणी तसेच तालुकाध्यक्ष त्यांची कार्यकारीणी व सदस्य आणि जिल्हयातील पत्रकार बांधवांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. संपदा जगताप तर आभार जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे यांनी मानले.

———————————————–
फोटो – सातारा येथील डिजिटल मिडिया कार्यशाळा मान्यवर… (छाया- निनाद जगताप, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments