सातारा : लाडकी बहिण योजना व कायदा सुव्यवस्था राखण्याची वचननाम्यात शपथ
घेतल्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आलेले आहे. सध्या मुख्यमंत्री व
गृहमंत्री म्हणून शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये शासकीय पातळीवर जलद गतीने काम
करण्याची उपयुक्त सुचना केलेली आहे. त्याचे आरपीआय ए गटाने स्वागत केले आहे. तसेच
अनाधिकृत दारु विक्री व मटका बंद करण्याकरीता कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार
आहेत. तत्पूर्वी जावली पॅटर्न सारखा सातारा तालुक्यात पॅटर्न राबवावा अशी मागणी
आर.पी.आय. ए गटाचे तालुकाध्यक्ष विजय ओव्हाळ यांनी दिलेल्या निवेदनात केलेली
आहे. महायुतीचे विरोधक असूनही त्याबाबत आरपीआय एकटा ने राज्य सरकारच्या मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आहे.
सातारा जिल्हयातील सातारा जावली विधान मतदार संघामध्ये मेढा पोलिस ठाण्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर महाराष्ट्र अधिनियम १९४९ कलम ६५ ( इ) प्रमाणे २९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करुन धडाकेबाज कारवाई केलेली आहे. सातारा व जावळी या दोन तालुक्याचा समावेश एकाच मतदार संघात येतो.जावळी तालुक्यासारखी सातारा तालुक्यातील परळी, नागठाणे, लिंब, रामनगर,
शेंद्रे, वाढेफाटा, शिवथर सातारा शहरातील काही ठिकाणी तसेच कण्हेर, मांडवे,
नागेवाडी, सज्जनगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात आणि ठोसेघर परिसरात अनाधिकृत दारुविक्री व मटका व्यवसाय सुरु आहे.
याला राज्यकर्ते व काही ठेकेदार
यांचे पाठबळ आहे. अशी स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिलेली आहे.
खर म्हणजे पोलिस पाटलांकडून लेखी स्वरुपात माहिती घेणे अपेक्षित आहे. असे न होता सातारा तालुक्यात कारवाईचा दिखावा केला जातो. या परिसरातील रस्त्यावर काही धाबे हे ओपन बार म्हणून ओळखले जातात.
शंभर दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा निवेदनाची देवा वेळ येऊ नये . अन्यथा आरपीआय एकटाच वतीने आंदोलन करण्यात येईल असही इशारा निवेदनात दिलेला असून निवेदनावर अनेक कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या सही असल्याची माहिती आरपीआय ए गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान जावळी तालुक्यामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी धडाकेबाज कारवाई करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. तशाच पद्धतीने सातारा तालुक्यातही कारवाई होणे अपेक्षित असल्याचे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे.



