ताज्या बातम्या

शिवछाया मित्र मंडळ व साईदयाघना मंदिराचा ३७वा वर्धापन व साई उत्सव जल्लोषात संपन्न 

प्रतिनिधी – नवयुगनगर,दिवाणमान,वसई पश्चिम येथील शिवछाया मित्र मंडळ व साईदयाघना मंदिराचा ३७ वा वर्धापन व साई उत्सव २३,२४ व २५ जानेवारी २०२५ रोजी विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांने उत्साहात संपन्न झाला,
गुरूवार दि.१६ ते २३ जानेवारी रोजी श्री साईसच्चरित पारायण सप्ताह व सांयकाळी साईबाबांच्या पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक साईबाबांचा देखावा,लेझीम पथक, धुर्म्रवर्ण ढोल पथक,बेंजो ,जगदगुरू श्री नरेंद्र महाराज भजन मंडळ,सुंदर रांगोळ्या, गुलाब फुलांची पुष्पवृष्टी , रंगीबेरंगी फटाके आतषबाजी,पालखीचे मानकरी मा.श्री. हरिलाल जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,माणिकपूर पोलिस स्टेशन व मा.श्री.प्रशांत लांगी,पोलिस निरीक्षक,वाहतूक शाखा,वसई परिमंडळ-२ ,संदेशभाऊ जाधव व मंडळाचे पदाधिकारी,महिला साई भक्त पारंपरिक वेशभूषेत नाचत उत्साहात सहभागी झाले होते.दुसऱ्या दिवशी महिलांचा जल्लोष कार्यक्रमात , निवेदिका मोनिका यांनी महिलांचे विविध गंमतीदार खेळ घेतले व विजेत्या स्पर्धकांना गृह उपयोगी वस्तू बक्षिसे देण्यात आली यावेळी महिलांनी सोलो व ग्रुप नृत्य तसेच भारतीय नारींच्या पारंपरिक विविध वेशभूषा परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेच दर्शन घडविले या सर्वांनाच बक्षीसे साहित्यप्रेमी मान्यवर सीमा पाटील,पल्लवी बनसोडे,संगीता अरबुने,सुषमा राऊत,स्वाती जोशी ,माजी नगरसेविका भारती ठाकूर,मीना अडसुळ,गीता मानकर व प्रियंका जाधव,बबीता छेडा,भारती पाटील इत्यादींच्या हस्ते देण्यात आली,पुष्पा जाधव यांनी उत्कृष्ट नियोजन केले व उपस्थित सर्वच महीलांना हळदीकुंकू,तिळाचे लाडू व आकर्षक उपयोगी भेटवस्तू अक्षता जाधव, निता गवस,श्रृती सावंत , श्रद्धा वनमाळी सामंत यांचे हस्ते देण्यात आल्यात.
२५ जानेवारी हा साईबाबांच्या मुर्ती स्थापना दिन महाअभिषेक,होमहवन,श्री साईसत्यनारायण पुजा, सांज आरती,भंडारा प्रसाद,व सांस्कृतिक कार्यक्रम योगेश केळवेकर प्रस्तुत
” जल्लोष महाराष्ट्राचा ” महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा दर्शविणारा संगीतमय नृत्याविष्कार , माजी आमदार क्षितिज ठाकूर यांचे हस्ते उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आले, साईभक्त व नागरिकांच्या प्रचंड सहभागाने तिन दिवस भव्य जत्रा स्वरूप व परिसर साईमय झाला होता.
शिवछाया मित्र मंडळाचे सर्वेसर्वा संदेशभाऊ,पुष्पाताई,अध्यक्ष मिलिंद जाधव, संतोष वनमाळी,शैलेश राऊत,एकनाथ गवस,प्रशांत जाधव,अभय सावंत,बंटी जाधव, सिद्धेश जाधव इत्यादींनी मेहनत घेतली आहे,
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top