बार्शी : जिल्हा परिषद शाळा कव्हे ता बार्शी येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षिका सौ.उर्मिला पवार यांना जिजाऊ जयंती निमित्त कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर आयोजित सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांना कर्तृत्ववान पुरस्काराने सन्मानित झाल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांची उपस्थिती होती तसेच व्यासपीठावर म्हाडाचे उपसंचालक श्री अजय पवार, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री इशाधीन शेळकंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री देशमुख यांची उपस्थिती होती.
उर्मिला पवार यांनी कोरोना काळात बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आँनलाईन सुंदर हस्ताक्षर उपक्रम राबवला होती या उपक्रमाची दखल तत्कालीन शिक्षणमंत्री सौ वर्षा गायकवाड यांनी घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते तसेच कव्हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी वाढदिवस चाॅकलेट,केक न आणता विविध उपयोगी शैक्षणिक साहित्य देऊन साजरा केला जातो तसेच विविध आंतरराष्ट्रीय भाषेत विद्यार्थी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाला भाषणे सादर करतात या पुरस्काराबद्दल पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र शिंदे, बार्शी तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री महेश सुळे, गटशिक्षणाधिकारी श्री बालाजी नाटके केंद्रप्रमुख सिद्धेश्वर तिकटे यांनी अभिनंदन केले आहे.
उर्मिला पवार जिजाऊ जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित..
RELATED ARTICLES