Tuesday, October 28, 2025
घरमहाराष्ट्रक्रांती थिएटर च्या वतीने शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबांचे स्मृतिदिन...

क्रांती थिएटर च्या वतीने शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबांचे स्मृतिदिन ….

सातारा(अजित जगताप) : स्वच्छतेचे प्रणेते व पुरोगामी विचारांचे राष्ट्रसंत डेबुजी उर्फ गाडगे महाराज ६८ वा स्मृतिदिन साताऱ्यात साजरा होणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे विचार जपण्याचे काम तळागाळातील अनेक जण करत आहेत . संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये सातारा जिल्ह्यातील धामणेर, लोधावडे, निढळ , मान्याची वाडी अशा अनेक गावांनी राज्यात पुरस्कार प्राप्त केलेले आहे. त्याच सातारा जिल्ह्यात आता क्रांती थिएटर्स सातारा आयोजित सामाजिक कार्यावर जाहीर व्याख्यान व एक पात्री नाट्य प्रयोग आयोजित केला आहे. शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर परिवर्तन रंगमंच या ठिकाणी हा सामाजिक कार्यक्रम होत आहे. सदर कार्यक्रमाला प्रबुद्ध अभिनेता व क्रांती थिएटर्स चे अध्यक्ष अमर गायकवाड हे एकपात्री नाट्यप्रयोग सादर करणार आहेत .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी सुजित शेख व डी पी आय संस्थापक प्राध्यापक सुकुमार कांबळे, ज्येष्ठ विधीतज्ञ एडवोकेट राजेंद्र गलांडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रमेश इंजे, शाहीर भानुदास गायकवाड, अजित जगताप, डॉ. प्रमोद फरांदे, सुरेश बोतालजी, संदीप कांबळे, संजय गाडे, किशोर गालफाडे, रावण गायकवाड, शशिकांत गाडे, मोहन शेठ राजपुरोहित, रियाज बागवान, कबीर गायकवाड, पापा साहेब सातारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला स्वच्छतेची मोहीम राबवणाऱ्या सर्व स्तरातील लोकांनी उपस्थित रहावे. असे नम्र आवाहन स्वच्छता दूत यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments