प्रतिनिधी : गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे. अधिक माहिती लवकरच देण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर व रायगड जिल्हा जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन सबंधित विभागाला निर्देश दिले आहेत.

