Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रजावळी तालुक्यातील काटवली व शिंदेवाडी या गावात बिबट्याने तीन शेळ्या केलेल्या फस्त

जावळी तालुक्यातील काटवली व शिंदेवाडी या गावात बिबट्याने तीन शेळ्या केलेल्या फस्त

भिलार  : जावळी तालुक्यातील काटवली व शिंदेवाडी या गावात बिबट्याने तीन शेळ्या व ऐक कुत्रा फस्त केल्याने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. शेळ्या बिबट्यानेच फस्त केल्याची माहिती पशु पालकासह नागरिकांनी दिली.

काटवली येथील विजय परबती बेलोशे यांची कोरदाळा शिवारात चारण्यासाठी गेलेल्या शेळ्यांपैकी ऐक शेळी गायब झाल्याने ते शोधण्यासाठी गेले असता रानटी जनावरांने फाडून खाल्ल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बिबट्यानेच फस्त केल्याचे त्यांनी रामचंद्र शंकर बेलोशे यांचीही शेळी फस्त केल्याचे समजले. याच पद्धतीने या गावाला लागूनच असणाऱ्या शिंदेवाडी गावातील शिवारात चरणाऱ्या भाऊसाहेब शिंदे यांचेही शेळीवर बिबट्याने झडप घालून गायब केली आहे. तर याच गावातील गणेश राजाराम शिंदे यांचेही कुत्रे बिबट्याने नेल्याचे सांगितले.

तब्बल 3 शेळ्या अचानक फस्त झाल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले. त्यांना आर्थिक मदत मिळावी व बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी काटवली व शिंदेवाडी गावातील नागरिकानी वनविभागाकडे केली आहे. बरेच दिवसांपासून पांचगणी व परिसरात बिबट्यांने दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसापूर्वी पाचगणीत बिबट्यांचा धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. शहरात व डोंगररांगात बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचे दिसून येत आहे. भिलार मध्ये बिबट्या विहिरीत पडल्याने त्याला नागरिकांनी जीवदान दिले होते. त्यामुळे या घटनांमुळे बिबट्या या परिसरात वास्तव्यास असल्याचे निदर्शनास येत आहे. बिबट्याने शेळ्या फस्त केल्याच्या घटना समोर आल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले. जोपर्यंत दहशत निर्माण करणारे बिबटे जेरबंद होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
सोबत फोटो आहे.
काटवली : विजय बेलोशे याची बिबट्याने फस्त केलेली शेळी

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments