
प्रतिनिधी : महाबळेश्वर सांस्कृतिक कला मंडळ नेरूळ नवी मुंबई यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्यात येतो. त्या अनुषंगाने महाबळेश्वर सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने ३८ वर्ष हे कार्य अविरत सुरू असून या मंडळाच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने संस्थेने सिडकोकडे पाठपुरावा करून सेवाभावी संस्थेकरीता कार्य करण्यासाठी एक भूखंड मिळविला असून सदर भूखंडाचे भूमिपूजन रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी नेरूळ या ठिकाणी होणार आहे.
तरी कृपया सातारा जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनी आणि मुंबईस्थित असणारे सर्व व्यावसायिक व चाकरमानी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे .
आपल्या सातारा जिल्ह्यातील मुंबईकरांसाठी नव्याने साकारणारे हे एकमेव प्लॉट नंबर १५ सेक्टर २९ (नेरूळ बस डेपो शेजारी)नवी मुंबई येथे महाबळेश्वर भवन होत आहे. तरी या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे व आपला आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन मुख्य प्रवर्तक श्री वसंतदादा शिंदे यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.