Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रमॉर्निंग वॉक असो किंवा इव्हनिंग वॉक ..कल्पना करा की जंगलाच्या मधोमध, समुद्र...

मॉर्निंग वॉक असो किंवा इव्हनिंग वॉक ..कल्पना करा की जंगलाच्या मधोमध, समुद्र आणि पर्वतांच्या दृश्यांसह असेल, तेही मुंबईसारख्या महानगरात, तर?

धगधगती मुंबई : (प्रतिनिधी – मंगेश कवडे ) : मुंबईच्या मलबार हिल फ़ॉरेस्ट क्षेत्रात शहराचा पहिला इलेव्ह्टेड फ़ॉरेस्ट वॉल्कवे तयार होऊन लवकरच लोकांसाठी उघडण्यास सज्ज आहे!

येथे येणारे पर्यटक Glass-Bottom डेक च्या माध्यमातून वॉक करता-करता गिरगाव चौपाटी आणि अरेबियन समुद्राचे मनमोहक दृश्य पाहू शकतील. ७०५ मीटर लांबचा हा रस्ता निसर्गाच्या सुंदरतेचा व शांततेचा अनोखा अनुभव देईल.

मुख्य म्हणजे जंगलातील एकही झाडाला इजा न पोहचवता हे बांधण्यात आले आहे!

कमीत कमी सिमेंट चा वापर करत डेक पूर्णपणे लाकडाचा बनवलेला आहे; जेणेकरून नैसर्गिक नद्या आणि झरे यांच्या प्रवाहात कोणताही अडथळा येणार नाही आणि जंगली प्राणी-पक्ष्यांनाही त्रास होणार नाही.

२०२२ मध्ये सुरू झालेले त्याचे बांधकाम थोडे वेगळ्या पद्धतीने झाले. हे जंगलाच्या क्षेत्रात होते म्हणून याला बांधण्यात बराच काळ गेला. याचे काम अत्यंत शांतपणे आणि संवेदनशीलतेने पूर्ण करण्यात आले आहे!

मजबूत स्टील पासून बनवलेला हा वॉल्कवे सिंगापूरच्या ट्रीटॉप वॉल्क्वेस पासून प्रेरित आहे. सुरक्षा आणि आरामाच्या दृष्टीने येथे वूडन डेक , रैलिंग आणि मध्ये-मध्ये वर्टिकल सपोर्ट बनवले गेले आहेत.
येथे बर्डवॉचिंग झोन आणि एक Glass-bottom Viewing Deck देखील असेल. हा वॉल्क , जॉगिंग करणाऱ्यांसाठी आणि निसर्ग प्रेमी साठी एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे.

या वॉकवे ची एन्ट्री आणि एक्सिट पॉईंट कमला नेहरू पार्कच्या मागे सिरी रोडवर असतील. २५ कोटींच्या बजेट मध्ये बनलेल्या या पाथवे ची सुरुवात जानेवारी २०२५ पासून होणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments