ताज्या बातम्या

राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण

प्रतिनिधी : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसेच  पोस्टरचे अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. 

कार्यक्रमाला जेष्ठ अर्थतज्ञ, लेखक व माजी  खासदार डॉ नरेंद्र जाधव,  डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे  महासचिव नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रविंद्र गरुड,  भदंत भन्ते सदनानांद थेरो, उषा रामलू, शशिकला जाधव तसेच इतर मान्यवर  उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top