ताज्या बातम्या

किया इंडियाने १ लाख CKD निर्यातीचा टप्पा पार २०३० पर्यंत CKD निर्यातीचे प्रमाण दुप्पट करण्याचे नियोजन, मध्यपूर्व व आफ्रिका बाजारपेठेत विस्तार

नवी दिल्ली :  २५ नोव्हेंबर २०२४: प्रीमियम वाहन निर्माता किया इंडिया यांनी जून २०२० पासून अनंतपूर उत्पादन केंद्रातून निर्यात सुरू केल्यापासून १,००,००० CKD वाहनांच्या निर्यातीचा टप्पा पार केल्याची घोषणा केली आहे.

किया इंडिया हे किया कॉर्पोरेशनसाठी एक महत्त्वाचे निर्यात केंद्र असून, कंपनीच्या एकूण CKD निर्यातीपैकी ५०% हिस्सा भारतातील आहे.

किया इंडिया २०२४ मध्ये उझबेकिस्तान, इक्वाडोर आणि व्हिएतनाम बाजारपेठांमध्ये ३८,००० हून अधिक CKD युनिट्स निर्यात करण्याची क्षमता आहे. सेल्टॉस, सोनेट आणि कॅरन्स या मॉडेल्सच्या बाजारपेठेतील यशामुळे स्पर्धात्मक किंमती व उत्पादनाची गुणवत्ता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत किया इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी, जून्सू चो म्हणाले: “किया कॉर्पोरेशनसाठी भारत हे केवळ एक मजबूत विक्री केंद्रासोबत एक उदयोन्मुख निर्यात केंद्र देखील आहे. या टप्प्यामुळे किया इंडियाची उत्पादनातील उत्कृष्टता, नाविन्यपूर्णता आणि जागतिक ग्राहकांना मूल्य प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचा प्रत्यय येतो. सेल्टॉस, सोनेट आणि कॅरन्स मॉडेल्सचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील उत्कृष्ट प्रदर्शन पाहून आम्हाला अभिमान वाटतो. यासाठी सरकारच्या निर्यात-मैत्रीपूर्ण धोरणांचेही आम्ही आभारी आहोत, ज्यामुळे जागतिक ऑटोमोटिव्ह मूल्यसाखळीत भारताची भूमिका अधिक मजबूत झाली आहे. भविष्याकडे पाहताना, आम्ही मध्यपूर्व व आफ्रिका बाजारपेठांमध्ये CKD निर्यातीचा विस्तार करून २०३० पर्यंत निर्यात क्षमतेत दुप्पट वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top