Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमिरजगाव येथे सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ साठे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मा श्री...

मिरजगाव येथे सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ साठे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मा श्री सत्यवान मंडलिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी –. ‘जग बदल घालूनी घाव| सांगून गेले मला भीमराव||’ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कर्जत तालुका साहित्य प्रेमी मंडळ अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव तालुका कर्जत येथे आयोजित समितीचे अध्यक्ष अभ्यासू, विचार व साहित्याची जाण असणारे तरुण मा श्री तानाजी डाडर, मार्गदर्शक असणारे उपाध्यक्ष मा प्रा श्री देवीदास राऊत आणि त्यांच्या विचारांना साथ करीत नेहमीच सक्रिय असणारे कार्याध्यक्ष मा श्री सुनील गाडे यांनी अपार कष्ट घेऊन आयोजित केलेले थोर साहित्यिक शंकर भाऊ साठे यांच्या स्मृतींना समर्पित करणारे सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ साठे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले.
संमेलन सोहळ्याची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. यावेळी सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ढोल ताशा आणि लेझमाच्या तालात परिसर दणाणून सोडला. या भव्यदिव्य सोहळ्यातील उपस्थितांच्या उत्साहाने अण्णाभाऊंनी सांगितलेल्या विचारांची प्रेरणा येथे जाणवल्याशिवाय राहिली नाही. संपूर्ण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद दंगल कार कवी नितीन चंदनशिवे यांनी भुषविले. तर उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मीकराव निकाळजे (तात्या) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोककुमार शर्मा- कुसुमाग्रज प्रतिष्ठान, स्वागताध्यक्ष सुरेश काका घोडके, उद्धव शेठ निवसे, शिंदे मेजर, मेजर भीमराव उल्हारे हे प्रमुख व्यासपीठावर विराजमान होते. दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी अगदी कमी वयात साहित्य जीवनात आलेला अनुभव कथन करताना कुवेत मधला प्रसंग, अंगात कोट घालण्याचा किस्सा सांगून उपस्थिततांकडून प्रचंड टाळ्यांची दाद मिळून साहित्यिकातील एक पैलच दाखवून दिला. यावेळी सद्गुरु उद्योग समूहाचे श्री शंकर शेठ निवसे यांना उद्योग भूषण, प्रगतीशील शेतकरी सौ राजश्री मिनीनाथ गोरे यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जेष्ठ साहित्यिक मा श्री सत्यवान मंडलिक यांना साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा हा या वर्षातील दुसरा साहित्य भूषण सन्मान आहे. समाजात आता बदल होत आहे. अण्णाभाऊंचे विचार रुजवण्यासाठी साहित्य चळवळ उभी राहिली पाहिजे त्यासाठी अशी साहित्य संमेलने जिल्हा तालुकाच काय पण आता गावोगावी झाली पाहिजेत.आजच्या वैज्ञानिक व संगणकीय युगात वाचक कमी झाला असला तरी ते लिहीण्या वाचनाचे ज्ञान शाळेतून,पाटीवर पेन्सिलने गिरवून आणि पुस्तकातल्या धड्यातून मिळते.ते धडे लेखकांनीच लिहिलेले आहेत.भविष्यात पुन्हा वाचनाची संस्कृती जपली जाऊन साहित्य व साहित्यिक यांना सन्मान मिळेल अशी आशा व्यक्त करुन आपले विचार मा.श्री सत्यवान मंडलिक यांनी एक साहित्यिक म्हणून व्यासपीठावरून मांडले.
ग्रंथ दिंडीने सुरुवात झालेली पहिल्या सत्राची सुरुवात कुमारी स्नेहल डाडर या मुलीच्या ‘मी महात्मा फुले बोलतोय’ या महात्मा फुले वेशभूषित एकपात्री नाट्यप्रयोगाने झाली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार त्यांनी आपल्या एकपात्री नाटक रूपाने अप्रतिम असे सादर केले.तत्पुर्वी शाहीर बाबासाहेब राजगुरू यांनी आपल्या शाहीरी शैलीत महापुरुषांचे गीत सादर केले.तर संगीत वीशारद मा.तुपेसर आणि पांडूरंग डाडर यांनी शास्त्रीय संगीतात अण्णाभाऊ साठे व बाबासाहेब आंबेडकर यांची गीते सादर केली.या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन मा प्रा श्री राजेंद्र गायकवाड सरांनी केले.
दुसऱ्या सत्रात अंनिसचे महाराष्ट्र सदस्य मा श्री प्रशांत पोतदार यांनी ‘मनोरंजनातून विज्ञान’ या कार्यक्रमातून बुवाबाजी, करणी,भानामतीच्या नावाखाली बुवा-साधूंकडून लोकांची कशी फसवणूक केली जाते यांचे वैज्ञानिक प्रयोग दाखवून अंधश्रद्धेवर विश्वास का ठेवू नये याची प्रत्यक्ष प्रात्यक्षित करून लोकांना बुवाबाजीपासून सावध राहण्याचा मोलाचा सल्ला दिला.
कवी संमेलनात कवींनी आपल्या बहारदार कविता सादर करून खरी रंगत आणली. कवींमध्ये प्रवीण घुले, हनुमंत येवले, महादेव लांडगे, उज्वला जाधव, बालकवीत्री जानवी मंडलिक, प्रा. गोकुळ गायकवाड, प्रा विठ्ठल काळे, अलका केदारी, नवनाथ केंदळे, सौ लक्ष्मी लांडगे, शिरीष जाधव, अवंती तनपुरे, शर्मिला गोसावी, पी एन डफळ, ज्योती सोनवणे, चंद्रकांत भैलुमे, सुरेश चव्हाण, जयश्री पोद्दार, दगडू उमाप, श्री सत्यवान मंडलिक,शेलार सर यांनी आपल्या दमदार कवितांचे सादरीकरण केले. त्यास उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा विक्रम कांबळे सरांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजनामध्ये श्री तानाजी डाडर-अध्यक्ष, सुनील गाडे-कार्याध्यक्ष, प्रा देविदास राऊत सर- उपाध्यक्ष, दत्ताभाऊ घोडके, मोहित सकट, संजय शेलार,दिनेश अडागळे, महेंद्र जगधने, चंद्रकांत डोलारे, अक्षय डाडर, सदाशिव जवणे, शत्रुघ्न डाडर, निलेश जगधने ,रवींद्र गोरे, राजू जगधने, संभाजी डाडर इत्यादींनी सहभागी होऊन कार्यक्रमची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा श्री तानाजी डाडर यांनी केले तर शेवटी सुनील गाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments