प्रतिनिधी : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळ तर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

11 फेब्रुवारी 2025 पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे व 21 फेब्रुवारी 2025 पासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
परीक्षेमध्ये कॉपी न व्हावे यासाठी सर्वच परीक्षा केंद्रावरती सीसीटीव्ही लावली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी बारावी ची परीक्षा ही दहा दिवस अगोदर घेण्यात येत येणार आहे.
कारण परीक्षा दहा दिवसा अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना नीट जाई परीक्षेसाठी वेळ मिळेल व परीक्षेचा निकाल नेहमीपेक्षा 15 ते 20 दिवस अगोदर लागण्याची शक्यता सांगण्यात येत आहे
कसे बघायचे वेळापत्रक?
१) शासनाने जारी केलेल्या शासकीय वेबसाईट वरती इयत्ता दहावी बारावी चे वेळापत्रक ऑनलाईन जाहीर केले आहे.
२) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जारी केलेल्या संकेतस्थळाला भेट द्या
३) वेळापत्रक बघण्यासाठी इथे क्लिक करा
http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in/
विद्यार्थ्यांनी या गोष्टी टाळाव्यात-
१) विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजित वेळापत्रक तयार करावे,
२) दररोज पेपर सोडून बघावे,
३) विद्यार्थ्यांनी खानपान ह्याच्यावरती लक्ष द्यावे,
४) विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व मोबाईल पासून दूर राहावे.