Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रनेरळ,कोदिवले येथील पिडीत शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे आमदार महेंद्र थोरवे यांचे आश्वासन

नेरळ,कोदिवले येथील पिडीत शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे आमदार महेंद्र थोरवे यांचे आश्वासन

प्रतिनीधी : शेतावरील साठवून ठेवलेल्या २५० हून अधिक भाताच्या भा-यांना काही अज्ञात समाजकंठकांनी आग लावून पेटवून दिल्याच्या घटनेविषयी चौकशी करत कुटूंबियांना आज प्रचार दौ-यादरम्यान आश्वस्थ केले

नेरळ – मागच्या आठवडयात दहिवली ग्रामपंचाय हद्दितील कोदिवले येथे काही अज्ञात समाजकंठकांकडून श्री.भगवान लक्ष्मण तरे, श्री.केशव लक्ष्मण तरे, श्री.नाना लक्ष्मण तरे आणि श्री.संतोष लक्ष्मण तरे यांच्या सामुहिक शेतीतून पिकविलेल्या भात धान्याच्या भा-यांची आग लावून सर्व उत्पन्नाची राख ऱांगोळी केली. ही घटना तालुक्यात क्षणात सर्वत्र पसरली आणि सर्व स्तरातून याचा निषेध नोंदविला गेला. आज शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचा मतदार संघात प्रचारदौरा असताना कोदिवले बस स्थानक येथे या शेतक-यांची भेट घेऊन झालेल्या घटनेबाबत चौकशी केली आणि लवकरच याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करून पिडीत शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले तसेच त्वरीत पोलिसांना संपर्क साधून याविषयी जलदगतीने तपास करण्याचे आदेश दिले.

सदर प्रसंगी याठिकाणी दहिवली ग्रामपंचायत हद्दिलीत बहुसंख्य नागरीकांसह मा.सभापती अमर मिसाळ, भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत, भाजपा उमरोली जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष केशव तरे, शिवसेना जेष्ठ कार्यकर्ते जनार्धत तरे, सरपंच मेघा अमर मिसाळ, उपसरपंच नरेश कालेकर आदी महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

याविषयी बोलताना पिडीत शेतकरी श्री.केशव लक्ष्मण तरे म्हणाले की, या घटनेचा लवकरात लवकर छडा लागून ज्या विकृत बुध्दीच्या माथेफिरूंनी अन्न जाळण्याचे पाप घडविले आहे त्यांना समोर आणले पाहिजे. आज आमदार महेंद्र थोरवे यांनी आमची विचारपूस करून झालेल्या घटनेबाबत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच आज ही घटना आमच्याबाबत घडली आहे ऊद्या इतर कोणाबाबतही घडू शकते म्हणून असे कृत्य करणा-या विकृतांना शिक्षा होणे गरजेचे आहे आणि पोलिस यंत्रणा हे काम लवकरच करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments