धारावी : मुंबई धारावीत निवडणूक प्रचार जोरात सुरू असून महायुती शिवसेनेचे उमेदवार राजेश खंदारे यांना दररोज मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळत आहे. राजेश खंदारे धारावीत घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत व महायुती सरकार धारावीच्या विकासाच्या मॉडेलला कसे पुढे नेणार आहे, याची माहिती देत लोकांचे अभिप्राय जाणून घेत आहेत. प्रचारादरम्यान काँग्रेसचे अनेक स्थानिक कार्यकर्ते राजेश खंदारे यांना पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. आणि त्यांच्या नावाचा खुलासा न करण्याची विनंती करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे की, एका घराण्यातीलच लोक सर्व पदांवर अनेक वर्षे बसलेले आहेत. आणि साध्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही. २५ वर्षे काँग्रेसमध्ये काम करूनही, तिकीट वाटपाच्या वेळी त्याच कुटुंबातील लोकांना पुढे आणले जात आहे. त्यामुळे आता घराणेशाहीला रोखण्यासाठी महायुतीचे उमेदवार राजेश खंदारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेत असल्याचे समजते. खंदारे घरोघरी जाऊन लोकांना भेटत आहेत आणि त्यांच्या पदयात्रा व सभांमध्ये स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
