प्रतिनिधी : धारावी विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये महायुती आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यापेक्षा महाविकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू असून त्यांच्या प्रचाराचा दुसरा टर्म पूर्ण झाला आहे. घरोघरी प्रचार रॅली चालू आहे. या रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सामील होत आहेत. प्रभाग क्रमांक १८६ मधील नगरसेवक वसंत नकाशे यांची टर्म पूर्ण झाली असली तरी मागील तीन वर्षात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली नसली तरी त्यांनी आपले काम चालूच ठेवले आहे. आणि त्याचाच फायदा महाविकास आघाडीच्या डॉ ज्योतीताई गायकवाड यांना होणार आहे. त्यांनी देखील प्रभाग क्रमांक १८६ मधील नागरिकांच्या भेटीसाठी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यामुळे भविष्यात त्या समस्या सोडवण्याचे त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे.


या रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या शिवसेना (उबाठा) गटाचे विभाग संघटक विठ्ठल पवार माजी नगरसेवक वसंत नकाशे, शाखाप्रमुख सतीश कटके, काँग्रेसचे पदाधिकारी महादेव नारायणे, विकी व्हटकर, अलका साबळे,निलेश साळुंखे यांचासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.