Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमुंबई मराठी पत्रकार संघाच्यादिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मुंबई मराठी पत्रकार संघाच्यादिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न


मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी दुपारी लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते आणि जपानमधील पहिले मराठी आमदार श्री. योगेंद्र पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय कौटुंबिक वातावरणात उत्साहात संपन्न झाले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दर्पण दिवाळी अंक २०२४ चे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राला दर्जेदार दिवाळी अंकांची परंपरा आहे. ही परंपरा सातत्याने जपण्याचे कार्य मुंबई मराठी पत्रकार संघ अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहे. दिवाळी अंक प्रदर्शनात उत्तमोत्तम अंक आपल्याला इथे पहायला मिळतात, अशा शुभेच्छा यावेळी डॉ. प्रकाश खांडगे यांनी दिल्या. मुंबई मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दर्पण हा दीपावली विशेषांक सुद्धा अत्यंत दर्जेदार असल्याची प्रशंसा त्यांनी केली.
श्री. योगेंद्र पुराणिक यांच्या निमित्ताने आपला पत्रकार दर्पण दिवाळी अंक आता थेट जपानमध्ये पोहोचणार असल्याने ही एक आनंददायक बाब आहे, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. प्रकाश सावंत आणि शैलेंद्र शिर्वेâ हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य अनुक्रमे नवशक्ति आणि पुण्यनगरीचे संपादक झाले. ही पत्रकार संघाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले. सर्वांनी या दोन्ही संपादकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. योगेंद्र पुराणिक यांनी या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्वेâ, प्रकाश सावंत, विश्वस्त राही भिडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
हे प्रदर्शन ९ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या कालावधीत साहित्यप्रेमींसाठी खुले असेल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments