Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रपिळवणुकीने पाणी सोडणाऱ्या कंत्राटी कामगारांचे साताऱ्यात हाल

पिळवणुकीने पाणी सोडणाऱ्या कंत्राटी कामगारांचे साताऱ्यात हाल


सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे लोकांची तहान भागवणारे सक्षम यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत केला जातो. परंतु पाणी सोडणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल होऊन सुद्धा संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा जिल्हा मजदूर संघाच्या वतीने कंत्राटी कामगारांनी एकजुटीने बेमुदत धरणा आंदोलन सुरू केले आहे.
विशेष बाब म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्तांनी बोलवल्या बैठकीत सुद्धा अधिकारी हजर राहत नसल्याने ”””ठेकेदारी आवडे सर्वांनाच”””” असंच काहीसं नमूद करावे लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे पूर्वी कायमस्वरूपी काम होत असल्याने कामकाजामध्ये व्यवस्थितपणा येत होता. कुठेही लोकांना आंदोलन करण्याची गरज भासत नव्हती. आताच्या घडीला ठेकेदारी पद्धतीने पाणीपुरवठा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड व नियुक्ती ही सध्या ठेकेदारी पद्धतीने गेले दीड वर्षापासून सुरू आहे.
संबंधित काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कपात करून कामगार नंबर देणे, राज्य कामगार विमा योजना कपात करून कामगारांना त्यांचा नंबर देणे, ओळखपत्र देणे, सुरक्षा साधना पुरवणे, दरमहा वेतनाची स्लिप देणे असे ठरले होते. परंतु ,अद्यापही एक वर्ष होऊन सुद्धा त्याची कुणीही दखल घेतलेली नाही. सध्या हे कामगार मिळेल त्या वेतनामध्ये राबवत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांना विचारले असता आमचा काही संबंध नाही तुमच्या कंत्राट दाराला विचारा असे सांगून या कंत्राटी कामगारांच्या दुःखावर मीठ चोळले जाते. अशी तक्रार कंत्राटी कामगारांची आहे. भविष्य निधीची कपात होते पण ते खात्यात पैसे जमा केले जात नाहीत. वाढीव काम करून सुद्धा त्याचे वेतन दिले जात नाही. साप्ताहिक सुट्टी नाही. दिवाळीला बोनस नाही. शासकीय सुट्टी नाही. हजेरी पुस्तक नाही. अशा अन्यायकारक बाबी बाबत कोणाचेही लक्ष नसल्यामुळे ठेकेदारांची मनमानी कारभार सुरू आहे. अशा कामगारांनी तक्रारी केलेली आहेत याची माहिती संबंधित अधिकारी वर्गाला सुद्धा देण्यात आलेली आहे. असे सांगण्यात आले . महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून पाणीपुरवठा कामाचे टेंडर एका कंत्राटदाराला दिले. त्यांनी त्याच्या सोयीनुसार सब कंत्राटदार नेमून या गरीब व बहुजन समाजातील कामगारांवर दहशत पसरवली आहे. जगातील कामगारांना एक व्हा अशी हाक देणाऱ्या कामगार नेत्यांचे सुद्धा कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. याबाबत लोकप्रतिनिधींकडे आवाज उठवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या सर्व बाबी कामगारांवर अन्यायकारक असल्यामुळे बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी सातारा शहर परिसरात पाणी सोडणाऱ्या कंत्राटी कामगारांनी बेमुदत संपर्क करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता सातारा शहर उपनगरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटी कामगारांबाबत कोणतेही धोरण नसल्यामुळे आता सातारचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून न्याय द्यावा. अशी मागणी कामगारांनी केलेली आहे. सदरचे निवेदन हे संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त सातारा व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा यांना देण्यात आले आहे . सातारा जिल्हा मजदूर संघाच्या वतीने सरचिटणीस रवींद्र माने व कंत्राटी कामगार गणेश माने, शेखर निकम, अभिजीत कोळपे, श्रीराम जाधव, सुमित शिंदे, ज्ञानेश्वर खामकर, किरण माने, विठ्ठल खामकर, सुनील जगताप, अमोल कापले ,रामचंद्र कोळपे ,अक्षय सुतार, पंकज उंबरे, कृष्णा जाधव, सुशांत निंबाळकर, रोहित कोळपे, रवी चलवादी, चैतन्य दनाने, दीपक फाळके सुरज खोमणे सुरज पिसाळ, अकबर शेख, आकाश पवार ,गणेश पवार, सचिन गौड आदी साताऱ्यातील जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कामगार न्यायासाठी आंदोलन करून घोषणाबाजी करत आहेत. या कामगारांना न्याय देण्यासाठी सकल हिंदू समाजाने सुद्धा बहुसंख्येने हिंदू असलेल्या कंत्राटी कामगारावर अन्याय होऊ नये. म्हणून हिंदू म्हणून लक्ष घालावे. अशी मागणी आता सातारा जिल्ह्यातील कामगार चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी केलेली आहे. याबाबत आता सकल हिंदू संघटना काय भूमिका घेते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments