Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रराजाराम डाकवे (तात्या) यांचे व्दितीय पुण्यस्मरण १८ सप्टेंबर रोजी

राजाराम डाकवे (तात्या) यांचे व्दितीय पुण्यस्मरण १८ सप्टेंबर रोजी

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दि.१८ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रतिमा पुजन, ग्रंथालयाचे लोकार्पण, पुष्पवृष्टी, महाप्रसाद, इ.कार्यक्रमांचे चे आयोजन मु.डाकेवाडी, पो.काळगांव, ता.पाटण, जि.सातारा या ठिकाणी केले आहे.
राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, चित्रकला स्पर्धा असे अभिनव उपक्रम राबवत तात्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले.
व्दितीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गयाबाई डाकवे, भरत डाकवे, डाॅ.संदीप डाकवे व समस्त डाकवे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments