मुंबई (मोहन कदम /शांताराम गुडेकर ) : कोकणातील माणूस हा गणेशोत्सवात मनसोक्त मजा करतो.कोकणात जसं गणेशोत्सवाचं महत्व अधिक आहे.तसेच गणेशोत्सवात जाकडीनृत्य म्हणजेच शक्तीतुरा नृत्याचे महत्त्व आहे.शक्तीतुरा हे कोकणच्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य म्हणावे लागेल.रत्नागिरी,सिंधुदुर्ग ,रायगड मध्ये हा नृत्य प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो.कुणबी समाजातील श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्य प्रकार म्हणून प्रसिध्द आहे.नृत्यातला थाट,गाण्याचा तालही व संगीत साधने कालपरत्वे बदलल्याने त्याचं मूळ स्वरुप पूर्णपणे बदलल्याचा अनुभव हे नृत्य पाहताना येतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.कासार कोळवण मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उगवती वाडी (कासारकोळवण)याठिकाणी गणेशोत्सवनिमित्त मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता कवी श्री.सचिन कदम (कॅसेट फेम) आणि कवी श्री.विकास लांबोरे यांच्यातील शक्ती वाले विरुद्ध तुरेवाले असा सामना रंगणार आहे.
यानिमित्ताने उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळाचे तसेच आपत्कालीन सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींचे आणि श्वानप्रेमी यांचा आयोजकांतर्फे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.या सर्व कार्यक्रमाला वाशिष्ठि डेअरी प्रकल्पचे प्रमुख प्रशांत यादव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.तरी या जंगी सामन्याला संगमेश्वर तालुक्यातील शक्ती -तुरा रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आनंद लुटावा असे आवाहन आयोजक विजय शंकर करंबेळे यांनी केले आहे.
१० सप्टेंबरला कासारकोळवण येथे मनसे तर्फे शक्ती तुऱ्याचा जंगी सामना
RELATED ARTICLES