Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रसातारा सज्जनगड येथील बुरुजाचे दगड कोसळले

सातारा सज्जनगड येथील बुरुजाचे दगड कोसळले

सातारा(नितीन गायकवाड) – सातारा शहरापासून सुमारे अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सज्जनगडावर जाणाऱ्या प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज महाद्वाराच्या उजव्या बाजूच्या बुरुजाचे दगड रविवारी रात्री सुरु असलेल्या पावसाने पायऱ्यावर कोसळले. तीन दिवस झाले तरीही ते दगड तसेच आहेत.प्रशासनाकडून अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणून सज्जनगड ओळखला जातो.या गडावर जाणाऱ्या मुख्य महादरवाजाच्या उजव्या बाजूच्या बुरुजाचे दगड पावसामुळे रविवारी रात्री साडेआठ वाजता कोसळले. त्यावेळी जोरात आवाज झाला. मात्र, त्यावेळी कोणीही तेथून जात नव्हते. गडावर आणि गडाच्या पायथ्यालाच थांबलेल्यांनी हा आवाज ऐकला.संततधार पावसामुळे ही पडझड झाली आहे.तसेच पार्किंगच्या रस्त्यावरही मातीचा भराव ढासळला आहे.तीन दिवस झाले ढासळलेले दगड तसेच रस्त्यात पडले आहेत. सातारा तालुका प्रशासनाने हे दगड बाजूला केलेले नाहीत. तसेच इतरही उपाययोजना केल्या नसल्याने गडप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments