Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रआझाद मैदानातील सरपंचांच्या आंदोलनासाठी उध्दव ठाकरे..नाना पटोले अन् शरद पवार यांची उपस्थिती

आझाद मैदानातील सरपंचांच्या आंदोलनासाठी उध्दव ठाकरे..नाना पटोले अन् शरद पवार यांची उपस्थिती

मुंबई (रमेश औताडे) : ग्रामीण भागाचा कणा असलेला सरपंच हा महत्वाचा घटक आहे. त्यांच्या मागण्या म्हणजे सामान्य जनतेच्या मागण्या असतात. आमचे सरकार सत्तेत असताना या घटकासाठी अनेक लाभ मिळाले होते. भविष्यात या घटकाच्या सर्व मागण्या पूर्ण करू. असे आश्वासन देण्यासाठी जाणते राजे शरद पवार, उध्दव ठाकरे व नाना पटोले यांनी बुधवारी आझाद मैदानात येऊन सरपंच, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक, ग्रामविकास अधिकारी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, आता आमच्या हातात फक्त माईक आहे म्हणून आम्ही आता फक्त शब्द देऊ शकतो. सत्तेत आल्यावर आपल्या सर्व मागण्या मान्य पूर्ण करू. तर नाना पटोले म्हणाले, हे खोके सरकारने तुमचे भले करणार नाही. आम्ही सत्तेत आलो तर आपल्या कोणत्याच मागण्या प्रलंबित राहणार नाहीत. तर शरद पवार यांनी सांगितले की, हा घटक आहे म्हणून गावचा विकास होतो. हाच घटक जर दुर्लक्षित राहिला तर गावचा विकास कसा होईल. त्यामुळे आता या घटकाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.

मुंबईत सरपंच भवन असेल तर आम्हाला मुंबईत आल्यावर निवासाची सोय होईल. त्यामुळे सरपंच भवन बांधावे. ग्रामपंचायत करांच्या जुन्या थकबाकी साठी अभय योजना असावी. सरपंचांना विमा योजना असावी. मानधन वाढ व सभा भत्ता, १५ लाखापर्यंत विकासकामे करण्याची मान्यता इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोठ्या संख्येने आझाद मैदानात आलेले सरपंच, ग्रामरोजगार सेवक,आल्याने शरद पवार, उध्दव ठाकरे नाना पटोले यांनी भेट दिल्याने आंदोलन कर्ते आनंदी झाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments