मुंबई : बदलापूरच्या शाळेतील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न् केल्याचा दावा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी बुधवारी केला. घटना घडल्यानंतर मुख्याध्यापकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे टाळल्याचेही अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी नमूद केले आहे.बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकल्यांवर शाळेच्या कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कारवाईसाठी आग्रह करणाऱ्या पालक, रहिवाशांनी मंगळवारी आंदोलन केले होते. आंदोलकांनी यानंतर शाळेची मोडतोड तसेच रेल्वे, रस्तेमार्गही ठप्प केले.सुशीबेन शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असलेल्या बदलापूरच्या शाळा व्यवस्थापनाने पालकांना पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी सहकाऱ्य करण्याऐवजी गुन्हा दडविणे पसंत केले. शहा म्हणाल्या की, राज्य बाल हक्क समितीच्या प्रमुखांनी आपल्याला सांगितले की, त्यांनी पालकांच्या चिंतेबद्दल ठाणे जिल्हा बाल संरक्षण केंद्राशी संपर्क साधला होता. जेव्हा मी शाळेच्या व्यवस्थापनाला या प्रकरणाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी ते दाबण्याचा प्रयत्न केला. शाळा व्यवस्थापनाविरुद्ध पाक्सो तरतूद लागू का करू नये, असेही विचारल्याचे शहा म्हणाल्या.”संरचित प्रक्रियेची” शिफारस करणारभविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी शैक्षणिक संस्थांसाठी “संरचित प्रक्रियेची” शिफारस करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी सांगितले. राज्याने अशी पद्धती लागू करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही त्या म्हणाल्या.
बदलापूर शाळेतील प्रकरण दाबण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न; राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याचा दावा
RELATED ARTICLES