Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रदेवरुख जि.प.आदर्श शाळा नं.३ च्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी संदीप कांबळेउपाध्यक्षपदी पत्रकार सुरेश...

देवरुख जि.प.आदर्श शाळा नं.३ च्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी संदीप कांबळेउपाध्यक्षपदी पत्रकार सुरेश करंडे यांची बिनविरोध निवड

देवरुख (शांताराम गुडेकर ) : शहरातील जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक ३ च्या शाळा व्यवस्थापन समितीची नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी संदीप धोंडीराम कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीची सभा नुकतीच अँड भक्ती मुरूडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.याचवेळी पुढील दोन वर्षासाठी नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी संदीप कांबळे, उपाध्यक्षपदी सुरेश करंडे, सदस्यपदी स्वाती सावंत, माधवी जाधव, रुक्साना नदाफ, स्वाती प्रसादे, विभा गोरूले, रूपाली घडशी, जितेंद्र शेट्ये, श्रीकृष्ण आमडेकर, मंगेश गोरूले, शिक्षण तज्ञ म्हणून दिलीप बोथले, शिक्षक प्रतिनिधी योगेश भुवड, विद्यार्थी प्रतिनिधी तीर्था कोलते व समर कळंबटे तर सचिवपदी शाळेच्या मुख्याध्यापीका कृतिका सावंत यांची निवड करण्यात आली.
याचवेळी माता पालक व शिक्षक पालक समितीची निवड करण्यात आली. माता पालक समिती अध्यक्षपदी दुर्वा मोघे, उपाध्यक्षपदी सानिका टाकळे, सचिवपदी उज्वला जाधव तर सदस्यपदी अॅड भक्ती मुरूडकर, निधी भालेकर, रेश्मा मांगले, स्वाती दडस, कस्तुरी लिंगायत, सारथी घडशी, अनुसूया देवरूखकर, जान्हवी शेट्ये यांची निवड करण्यात आली आहे.
शिक्षक पालक समिती अध्यक्षपदी कृतिका सावंत, उपाध्यक्षपदी राहुल खानविलकर, सचिवपदी मिलिंद मांगले तर सदस्यपदी दयानंद हर्णे, महेंद्र करंबेळे, दिपक शिंदे, मयुरेश राणे, नुझत मापारी, स्नेहा खेडेकर, शीतल सावर्डेकर, सविता सापते, स्नेहल नलावडे, क्षितीजा पवार, अदिती सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.याप्रसंगी माजी शिक्षण तज्ञ युयुत्सु आर्ते,माजी अध्यक्ष दत्ताराम लिंगायत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments