Friday, October 24, 2025
घरमहाराष्ट्रधारावी मध्ये गाजलेले मनी बालन व दिव्या ढोले यांच्या विषयाला मनी बालन...

धारावी मध्ये गाजलेले मनी बालन व दिव्या ढोले यांच्या विषयाला मनी बालन यांच्या माफीनाम्यामुळे पूर्ण विराम

प्रतिनिधी : धारावीमध्ये अतिशय गाजलेला विषय भाजपच्या राज्य कार्यकारणी सदस्य दिव्या ढोले आणि मुंबई सचिव मनी बालन यांच्यातील सन २०१८ धारावी मध्ये तत्कालीन मंडळ अध्यक्ष मनी बालन यांनी दिव्या ढोले यांना अपशब्द वापरला (जातीवाचक शिवीगाळ) केल्याबद्दल बराच संघर्ष झाला,पोलीस ठाणे पर्यंत मोर्चे देखील निघाले. सदर प्रकरण कोर्टकचेरी पर्यंत गेले होते. मात्र हे दोन्ही भाजपचे पदाधिकारी असल्याने व देशातील नंबर वन चा पक्ष असल्यामुळे हा मुद्दा (विषय) संपवण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष व भाजपाचे मुंबई सचिव मनी बालन यांनी स्वतः भाजपा कार्यकारणी सदस्य श्रीमती दिव्या ढोले यांच्या कार्यालयात जाऊन माफीनामा व दिलगिरी व्यक्त केली आहे. सविस्तर वृत्तांत पुढीलप्रमाणे या प्रकरणामध्ये शुक्रवार दि. १६.०८.२०२४ रोजी तत्कालीन धारावी मंडळ अध्यक्ष मणी बालन यांनी दिव्या ढोले यांच्या वर्सोवा येथील कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी सन २०१८ मध्ये त्यांच्याकडून झालेल्या चुकी बद्दल लेखी माफीनामा देऊन श्रीमती दिव्या ढोले यांची दक्षिण मध्य मुंबई महामंत्री विलास अंबेकर यांच्या उपस्थितीत दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.
याबाबत श्रीमती दिव्या ढोले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे की,
असे म्हटले जाते, समोरच्याला केलेल्या किंवा आपल्या तोंडून निघालेल्या चुकीच्या गोष्टींचा पश्चाताप झाला असेल आणि त्यांनी क्षमा मागितली तर आपण ही मोठं मन करून एक संधी त्या व्यक्तीला सुधारायला दिली पाहिजे .
आणि हेच मी केले आहे. त्यांनी माफी मागितली आणि मी त्याला माफ केले आहे. यावरून सदर प्रकरण आता पूर्णपणे संपले असल्याने या प्रकरणाचे कोणी राजकारण करू नये असे दोन्ही पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments