Wednesday, October 15, 2025
घरमहाराष्ट्रआयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीची नेक्स्ट परीक्षा

आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीची नेक्स्ट परीक्षा

सातारा (अजित जगताप) : केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालय व राष्ट्रीय कौन्सिल यांच्यावतीने आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण दिले जाते. परंतु सध्या बी ए एम एस, बी. यु. एम. एस. शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना नेक्स्ट एक्झाम अनिर्वाय केल्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अभ्यासाचे ओझे लादले जात आहे. ते कमी करावे. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आज बुधवारी दुपारी दोन वाजता सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आयुर्वेदिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आले होते. वीस डिसेंबर २३ सुरू पर्यंत इंटरनलशिप संपली. किंवा 20 डिसेंबर अगोदर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट एक्झाम सक्तीचे केले आहे. सदर विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक शिक्षण प्रवेश घेताना त्याबाबत पूर्व सूचना दिली नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थी नाराज झालेले आहेत. असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
वास्तविक पाहता आयुर्वेदिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी साडेचार वर्षे लागतात. पण, सध्या सात वर्षे पूर्ण शिक्षण घेतल्याशिवाय पदवी मिळत नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. आयुर्वेदिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून आमदार शशिकांत शिंदे यांनी याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व इतर विभागाशी संपर्क साधून याबाबत नेमकं काय करावे लागेल. याची माहिती घेतो. वेळ पडल्यास याबाबत मंत्रालय पातळीवर चर्चा घडवून आणतो. असे आमदार शशिकांत शिंदे यांनी आश्वासन दिले. यावेळी आयुर्वेदिक शिक्षण घेणारे विद्यार्थी सौरभ चिंधे, श्रेयश निकम, समर्थ नायकवडी, शंकर जाधव, यशवंत दळवी व इतर विद्यार्थी उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत जागरूकपणे कार्यरत राहील. असे आ .शिंदे यांनी सांगितले. या वेळेला राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष अतुल शिंदे, राष्ट्रवादी सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला राष्ट्रवादी प्रदेश सदस्य सौ समिंद्रा जाधव, शफिक शेख व साताऱ्यातील नामांकित पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments