


प्रतिनिधी : आजचे जीवन हे धकाधकीचे आहे,जीवनात नक्की काय होईल सांगता येत नाही.आज प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो. या कामातून आपल्या परिवाराला वेळ देता येत नाही.आजी आजोबा संस्कृती लोप पावत चालली आहे.कारण आज अनेक घरात आजी आजोबांना जपायला वेळ नाही म्हणून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते.पैशांच्या नादात आपण नाती विसरत चाललो आहोत.म्हणूनच अशा निराधार असलेल्या आजी आणि आजोबांसाठी एक दिवस काढायचा आणि त्यांच्या सोबत दिवस काढायचा.जयेश चाळके यांच्या संकल्पनेतून आम्ही मराठी गोविंदा पथक आणि आम्ही मराठी वाद्य पथक यांच्या माध्यमातून लावणी कलावंत महासंघाच्या सहकार्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.भांडुप येथील हेवन ओल्ड एज केअर सेंटर येथील आजी आजोबांना उपयोगी साहित्य, नाश्ता आणि जेवणाची मेजवानी तसेच त्यांच्या करमणुकीसाठी भक्ती गाथा हा कार्यक्रम सादर करण्यात आला.लावणी कलावंत महासंघाच्या गायक,वादक, डान्सर,तंत्रज्ञ यांनी गाणी सादर करून त्यांचे मनोरंजन केले.त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून प्रत्येक जण भारावून गेला.जयेश चाळके आम्ही मराठीच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक काम करत असतात.त्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते.असाच हा एक दिवस आजी आजोबांसाठी होता.