Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रशरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी नादाला लागू नये! माझी पोर काय करतील...

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी नादाला लागू नये! माझी पोर काय करतील कळणार नाही, आरशात गाल बघावा लागेलं – राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे मला वाटते अशी ठाम भूमिका आज राज ठाकरेंनी मराठवाड्याचा दौऱ्यावर असताना केले आहे. राज ठाकरे म्हणाले,आपल्या महाराष्ट्रा सारखे सदन राज्य देशात नाही. माझा पक्ष २००६ साली स्थापना केला आहे. तेव्हाच भूमिका मांडली होती की राज्यात आरक्षण आर्थिक परिस्थितीवर द्यावे पण आपल्याकडे जातीपातीचे राजकरण सुरु आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालो तर राज ठाकरे विरूध्द मराठा समाज असा बातम्या माध्यमांमध्ये दिसल्या. पक्ष स्थापनेपासून भूमिका एकाच आहे आरक्षण आर्थिक निकषावर द्यावे.महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही शिक्षण उद्योग उपलब्ध असताना इतर राज्यातील मुलांना मिळतं मात्र आपल्या राज्यातील मुलांना मिळत नाही.पुरून उरेल एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत असे ठाकरे म्हणाले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी नादाला लागू नये!
राज ठाकरे काय म्हणाले, माझ्या दौऱ्यात मनोज जरांगेंचा काही संबंध नव्हता पण मनोज जरांगे यांच्याआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी राजकरण करतायत, मला मराठवाड्यात तसे दिसतंय. काही पत्रकार सुद्धा खतपाणी घालतात. धाराशिवला आलेल्या लोकांना भडकवण्याचे काम पत्रकारांनी केले, त्यातील दोनजण शरद पवारांच्या जवळचे आणि उद्धव ठाकरे गटाचे दोघेजण होते असा आरोप राज ठाकरेंनी लगावला आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एक समजून घ्यावे की मराठवाड्यात लोकसभेला झालेले मतदान हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना प्रेमापोटी नव्हते तर मोदी आणि शाहांच्या विरोधात मतदान झाले होते. संविधान बदलणार ते भाजपचा माणूस बोलला होता त्यांचा त्यांना फटका बसला. जरांगे पाटीलांच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे करतायत. शरद पवारांसारखा ८३ वर्षांचा माणूस महाराष्ट्रात मणिपूर होईल म्हणतोय. पुढच्या तीन महिन्यात मराठवाड्यात दंगली घडवता येतील यासाठी पवार ठाकरेंचे प्रयत्न सुरु आहेत असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
शरद पवारांचे राजकरण म्हणजे जातीपातीचे राजकरण आहे. माझ्या दौऱ्यात यांनी अडचणी आण्याचे प्रयत्न केले उद्या माझा पक्षाने ठरवले तर एकही सभा घेवू देणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी माझ्या वाटेला जावू नये. याच्यांकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत. यांना समाजात तेढ करुन राजकरण करायचे आहे. देवेंद्र फडणवीसांवर राग आहे तर त्यांना बोला समाजात का भांडण लावता? असे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे पाच वर्ष केंद्रात भाजपसोबत सत्तेत होते, शरद पवारांना मोदी गुरु मानत होते मग तेव्हा त्यांनी आरक्षणासाठी शब्द का नाही काढला. तुमचे राजकरण तुम्हाला लख लाभो पण माझ्या नादी लागू नका, माझी पोर काय करतील यांना कळणार नाही, नंतर आरशात जावून पोट पाठ आणि गाल बघावे लागेल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments