प्रतिनिधी : गेली १३ वर्ष सामाजिक श्रेत्रात कार्यरत असणाऱ्या १०५ गाव विभागातील कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्थेचा वतीने यंदा कांदाटी विभागातील श्री मल्लिकार्जुन विद्यालय वाघावळे - उचाट या हायस्कुल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप व शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर असा कार्यक्रम दिनांक १७/०८/२०२४ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. सदर शैक्षणिक उपक्रमात प्रमूख व्याख्याते म्हणून सन्माननिय श्री. रमेश हल्लोळीसर ( समुपदेशक महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी) म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण श्रेत्रात भरीव योगदान देणाऱ्या हल्लोळीसर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांचा पुढील शैक्षणिक कारकीर्दीत नक्कीच दिशादर्शक ठरेल. तसेच या कार्यक्रमात सह मार्गदर्शक म्हणून आपल्या विभागांतील वाकी गावचे सुपुत्र, पोलीस उपनिरीक्षक (PSI ) म्हणून शासकीय सेवेत रुजू झालेले कु. संकेत कदम तसेच म्हावशी गावचे श्री. धर्मेंद्र शिंदे CEO - AIM इन्स्टिट्यूट , श्री. अभिजित (आबा) पाटील - ABVP पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री व श्री देबू ज्योती रॉय आयटी डेव्हलपर, गव्हर्नमेंट आयटी सेक्टर आदी मान्यवर मंडळी विद्यार्थांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यास उपस्थित राहणार आहेत. या शैक्षणिक उपक्रमाला विद्यार्थी व पालक दोघांनीही उपस्थित राहावे ही संस्थेचा वतीने विनंती. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे व्यासपीठ उभे करण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या सोहळ्याला १०५ गाव समाजातील बरीच मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थीत राहणार आहेत. गेली अनेक वर्ष संस्थेचा माध्यमातुन राबविला जाणारा सामुदायिक विवाह सोहळा, सहयाद्री जल्लोश, वधू वर परिचय मेळावा, उद्योजक मेळावा असे सामाजिक उपक्रम नेहमीच लोक हिताचे राहीले आहेत अशी सद्भावना नेहमीच समाज बांधवान मधून व्यक्त होेत असते.या सर्वांचा स्वागता साठी कोयना धरण ग्रस्त संघर्ष समिती व समस्त कांदाटी विभाग सज्ज आहे. तेव्हा या शैक्षणीक सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्थेचा वतीने नम्र विनंती.
