प्रतिनिधी (नितीन गायकवाड) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे वडील आदरणीय संभाजी शिंदे यांच्या हस्ते नवीन तारापा ट्रायल स्वरूपात आज सुरू करण्यात आला यावेळी नगरसेवक प्रकाश शिंदे गटविकास अधिकारी मरबळ साहेब, सुपरवायझर संपत नलावडे,संतोष पवार,मंगेश माने,सुभाष कदम, सिताराम धनावडे,राहुल भोसले ,गणेश भोपळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते तरापा सेवेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सरपंच रमेश धनवडे यांनी दिली ही तारापा सेवा सुरू झाल्याबद्दल जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती महाबळेश्वर सर्व अधिकारी वर्ग यांचे रमेश धनावडे यांनी आभार व्यक्त केले.
