मुंबई (रमेश औताडे) : भारतात प्रथमच आय टी रिटर्न फाईल आता मोबाईल ॲप च्या माध्यमातून भरण्यासाठी माय आय टी रिटर्न संस्थेने ने सोपी सुलभ सेवा भारताच्या आयकर विभागाची अधिकृत मान्यता घेऊन सुरू केली असल्याची माहिती स्कोरीडोव्ह चे संस्थापक साकार यादव यांनी दिली.
आयकर विवरणपत्रे फाइल करणे सुलभ व्हावे, त्या प्रक्रियेत क्रांती घडावी या हेतूने हे मोबाइल ॲप डिझाइन करण्यात आले आहे. थेट स्मार्टफोन्सच्या माध्यमातून कर फाइल करण्याची मुभा करदात्यांना मिळाली आहे. त्यासाठी त्यांना कोणतीही प्रत्यक्ष कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नसल्याने कराचे फायलिंग घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कुणीही भरू शकतो.
केवळ ९९ रुपयांत कर फायलिंग सेवा अचूकता, कार्यक्षमता व सर्व सरकारी नियमांची पूर्तता यांची निश्चिती करत भारत सरकारच्या आयकर विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे. असे स्कोरीडोव्ह चे संस्थापक साकार यादव यांनी सांगितले.