मुंबई (रमेश औताडे) : बेस्ट प्रशासना तर्फे कोणतीही पूर्व सूचना न देता अनेक वर्षे एकाच ठिकाणी असलेला बेस्ट बस थांबा स्थलांतरित करण्यात आला होता. मात्र अंध, अपंग, वृद्ध, विद्यार्थी तसेच सर्व सामान्य रहिवासी एकत्र आल्याने बेस्ट थांबा पूर्ववत करण्यात आला.
राजेन्द्र नगर येथील ४६१,२२६,२२३ क्रमांक चा बेस्ट बस थांबा अचानक हलवुन नव्याने जनरल करिअपा पुलावर (पश्चिमेकडून येणारा) स्थलांतरित करण्यात आला होता.
नव्याने हलवलेल्या या बस थांब्या मुळे अंध, अपंग, वृद्ध, विद्यार्थी वर्गाला तसेच सर्व सामान्य रहिवाशांना देखील अडचणीचा अपघातांना निमंत्रण देणारा ठरत होता.
बस थांबा मुळ जागेवर आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली व खासदार गोपाळ शेट्टी व समाजसेवक सुधीर परांजपे, विनोद जाधव, योगेश चंपानेरकर यांच्या सहकार्याने जन आंदोलन करण्यात आले असता अखेर मनपा व बेस्ट प्रशासनाने नमते घेत जनहितार्थ तो बस थांबा पुन्हा जून्या जागेत स्थलांतरीत केला.