Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रचंद्रभागा रुलर डेव्हलपर च्या वतीने दहा हजार वृक्ष बी लागवड (वृक्षारोपण )...

चंद्रभागा रुलर डेव्हलपर च्या वतीने दहा हजार वृक्ष बी लागवड (वृक्षारोपण ) उत्साहात संपन्न …..दीपक लोखंडे यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य ..

कराड (प्रतिनिधी ) येवती ता. कराड येथे चंद्रभागा रुरल डेव्हलपरच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दीपक शेठ लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा हजार वृक्ष बी लागवड (वृक्षारोपण) करण्यात आले .यावेळी प्राध्यापक दिलीप लोखंडे ग्रामपंचायत सदस्य समाधान सोरटे ,माजी उपसरपंच सविनय सोरटे,रवींद्र सोरटे ,अरुण शेवाळे ,बौद्धजन हितवर्धक संघाचे सर्व पदाधिकारी,जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ सर्व पदाधिकारी ,विविध संस्थांचे पदाधिकारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ,यावेळी बोलताना दिलीप लोखंडे म्हणाले की ,आपल्या आयुष्यामध्ये ऑक्सीजन ला खूप महत्त्व आहे , ऑक्सीजनच नसेल तर आपण जगू शकत नाही ,एवढेच नव्हे तर झाडे लावल्याने हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते, मातीचे पूर्ण रक्षण होते आणि भरपूर प्रमाणात पाणी देखील उपलब्ध होते ,असे एक ना एक अनेक फायदे झाडे लावल्याने होतातआणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दीपक लोखंडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्मरणार्थ राबवलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन केले .यावेळी येवती धरणा पासून ते येवती मंदीर परिसर ते गलमेवाडी रोड पर्यंत दुतर्फा वृक्ष बी लागवड करण्यात आली .या परिसरात मुसळधार पाऊस असताना देखील वृक्ष बी लागवड (वृक्षारोपण) उत्साहात संपन्न झाली .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments