प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत सुमारे अर्धा डझन काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, ज्यामुळे महायुतीचे सर्व नऊ उमेदवार सहज विजयी झाले. तर महाविकास आघाडीला केवळ दोनच जागा मिळाल्या. काँग्रेसच्या प्रज्ञा राजीव सातव, तर उद्धव ठाकरे गटाचे मिलिंग नार्वेकर यांचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने नऊ उमेदवार उभे केले होते. निवडणूक सर्वांनी जिंकली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत सर्व 274 आमदारांनी शुक्रवारी मतदान केले. राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी निर्धारित 4 वाजेपर्यंत सर्व 274 सदस्यांनी मतदान केले. तुरुंगात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर मतदान करण्यासाठी विधानभवनात पोहोचले होते. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, भावना गवळी आणि कृपाल तुमाने विजयी झाले आहेत.