कराड ( प्रतिनिधी) येवती ता. कराड येथे रविवार दिनांक 14 रोजी सकाळी नऊ वाजता चंद्रभागा रुरल डेव्हलपर च्या वतीने 10,000 वृक्ष बी लागवड (वृक्षारोपण) मोहीम हाती घेतली असून या वृक्षारोपणासाठी सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन, चंद्रभागा रुरल डेव्हलपर चे संस्थापक अध्यक्ष दीपक शेठ लोखंडे यांनी केले आहे .आपल्या आयुष्यामध्ये ऑक्सिजनला खूप महत्त्व आहे , हवेची गुणवत्ता सुधारते, मातीचे रक्षण होते, पाणी भरपूर प्रमाणात मिळते असे अनेक फायदे झाडे लावल्याने होत असतात . आणि याच उद्देशाने चंद्रभागाच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे ,तो कौतुकास्पद आहे , यापूर्वी देखील चंद्रभागा रुरल ने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव देखील केला जातो, कुस्ती मैदान ,त्याचबरोबर कुस्ती मल्लांना दत्तक सुद्धा घेतले गेले , बैलगाडा शर्यत ,क्रिकेट शौकिनांसाठी क्रिकेट सामने ,गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणामध्ये मदत ,रुग्णांसाठी आर्थिक मदत अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवून चंद्रभागा चंद्रभागा रुलर डेव्हलपर ने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली .
