प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कुंभारगाव बीटमधील जि.प.प्राथमिक शाळा बामणवाडीच्या विद्यार्थ्यांनी इ.5 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्त्तुंग यश मिळवले. कु.पुर्वा राजेंद्र पवार हिने 286 गुण मिळवून राज्यात तिसरा आणि जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला. कु.मनस्वी दिपक करपे हिने 242 गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक बनण्याचा मान मिळवला. कु.तनिष्का विकास खिचडे हिने 238 गुण मिळवून शिष्यवृत्ती धारक यादीत स्थान मिळवले. 1 विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीधारक बनवण्यासाठी फक्त 2 गुण कमी पडले.
सर्व यशस्वी विद्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ.रुपाली राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी दिपा बोरकर, केंद्रसंचालक सुनील वायचळ, मुख्याध्यापिका संगिता देसाई आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिंनदन केले आहे.